मुंबई : बँकेत फिक्सड डिपॉझिट (Fixed Deposit) मध्ये गुंतवणूक करणं ही कायमच फायदेशीर मानली जाते. आतापर्यंत आपल्याला हेच माहित आहे की, मोठ्या काळाकरता म्हणजे long term करता FD मध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र आता देशात काही निवडक बँकांनी कमी काळाकरता म्हणजे शॉर्ट टर्म करता एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतो. ज्याचा सर्वाधिक काळ हा सहा महिन्यांचा आहे. या काळात जमलेल्या राशीवर व्याज देखील चांगल्या स्वरूपात मिळत आहे. 


या बँकेत आहे व्यवस्था 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या SBI, PNB, HDFC Bank आणि ICICI Bank मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. देशात सरकारी किंवा खासगी बँका ग्राहकांना फिक्सड डिपॉझिटचा पर्याय उपलब्ध करन देतात. या बँकांच्या नियम आणि व्याजाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. 


SBI मध्ये मिळणार ४.४० टक्के व्याज


सरकारी बँक असलेल्या SBI मध्ये ग्राहकांना २ करोडून कमी रक्कमेची एफडी ही ६ महिन्यापेक्षा कमी काळाकरता ४.४० टक्के व्याज दिलं जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये ४.९० टक्के व्याज मिळणार आहे. जर एखादा ग्राहक २ करोडहून अधिक रक्कमेची एफडी करत असेल तर त्याला २.९०टक्के व्याज मिळणार आहे. 


एचडीएफसी बँकेत मिळणार ४.१० टक्के व्याज 


एचडीएफसी बँकेत २ करोडहून कमी रक्कमेवर सहा महिन्याच्या एफडीवर ४.१० टक्के व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ४.६० टक्के व्याज मिळेल. २ ते ५ करोडच्या एफडीवर ३.५० टक्के व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना या रक्कमेवर ४ टक्के  व्याज मिळेल. 


पीएनबी बँकेत ज्येष्ठ नागरिकांना ५.२५ टक्के व्याज 


पंजाब नॅशनल बँकेत ६ महिन्याच्या कालावधीकरता २ करोडहून कमी रक्कमेवर ४.५० टक्के व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना ५.२५ टक्के व्याज मिळणार आहे. २ ते १० करोड रुपयांच्या एफडीवर ३.२५ टक्के व्याज मिळेल. 


ICICI बँकेत मिळणार व्याज 


ICICI ब्खेत प्रीमॅच्युअर विदड्रॉयल फॅसिलीटी असलेल्या स्कीममध्ये २ करोड रुपयांपेक्षा कमी असलेल्या काळात ६ महिन्याकरता ४.२५ टक्के व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ४.७५ टक्के व्याज मिळणार आहे. ५ करोड रुपयांपेक्षा कमी रुपयांना एफडी दर ३.५० टक्के व्याज मिळेल.