Fixed Deposits : सध्या अख्खं जग एक वेगळ्या संकटाचा सामना करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण बदलू लागलं आहे. 2023 पासून आर्थिक मंदीचेही वारे लागले आहे. त्यामुळे सगळीकडेच आर्थिक घडामोडींची चिंता जगाला सतावते आहे. त्यातूनच आता जगाच्या पाठीवर बॅंकांनीही रेपो रेट्स वाढविण्याचा विडा उचलला आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेनंही 8 फेब्रुवारी रोजी रेपो रेट्समध्ये (Repo Rates) 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे. रेपो रेट्समध्ये वाढ केल्यामुळे बॅंकाही आपल्या ठेवींवरील व्याज (Interest Rates) वाढवतात. (Fixed Deposits rates hike these banks has now increased know the latest rates)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

8 फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे.


खाजसी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडसइंड बँक आणि युनिटी स्मॉल फायनान्स बँकेनं एफडी (FD) म्हणजेच फिक्सड डिपॉझिट्सच्या दरामध्ये वाढ केली आहे. 15 फेब्रुवारीपासून बॅंकाच्या एफडीवरील व्याजदरातील वाढ लागू झाली आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकनं सेव्हिंग अकांऊटमधील 10 लाख रूपयांच्या ठेवींवर 4 टक्के व्याज तर त्यांवरील ते 1 कोटी रूपयांपर्यंत 6.25 कोटी टक्के दरानं व्याज मिळेल आणि 2 कोटींच्यावर 7.5 टक्के व्याज मिळेल. 


सध्या अशाच काही बॅंकानीही आपल्या एफडीच्या व्याजदरात घसघशीत वाढ केली आहे. इंडसइंड बँकेनंही (Indusland Bank) एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. 16 फेब्रुवारीपासून त्यांच्या दरातील वाढ लागू करण्यात आली आहे. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना 7.5 टक्के वाढ तर ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के व्याजदरावर वाढ दिली आहे. 0.50 टक्के अशी ही अतिरिक्त वाढ आहे.   


'या' बॅंकेकडून 9.5 टक्क्यांची वाढ - 


युनिटी स्मॉल फायनान्स (Unity Small Finance Bank) बँकेनं व्याजदरात मोठी वाढ केली आहे. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी  1,001 दिवसांसाठी 9.5 टक्क्यांची वाढ केली आहे. तर सामान्य नागरिकांसाठी 9 टक्क्यांची वाढ केली आहे. 181 ते 201 दिवस आणि 501 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींसाठी 8.75 टक्के व्याजदरात वाढ झाली आहे.  


बँकेने 1002 दिवस ते 5 वर्षे मुदतीच्या FD वर व्याजदर 7.65 टक्क्यांनी वाढवला आहे. युनिटी बँकने 7-14 दिवसांच्या FD वर 4.50 टक्के व्याज वाढवला आहे. युनिटी बँकेकडून 15 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 4.75 टक्के व्याज दिले जात आहे. 46 ते 60 दिवसांच्या एफडीवर 5.25 टक्के व्याज मिळत आहे. 61 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 5.50 टक्के दराने व्याज देण्याचे सांगण्यात आले आहे.