नवी दिल्ली : कोरोना काळात मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले. ज्याचा परिणाम प्रवासाच्या साधनांवरही झाला. वाहतुकीदरम्यानही सुरक्षित अंतर पाळलं जावं, कोरोनाचा संसर्ग कुठंही फोफावणार नाही, याची काळजी घेण्यासाठी म्हणून प्रशासनानं अनेक नियम लागू केले. आता त्यातच काहीशी शिथिलता येताना दिसत असून, याचे थेट परिणाम हे पर्यटन, प्रवासावर होताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारपासून 100 टक्के आसन क्षमतेनं विमान उड्डाणाला परवानगी, देण्यात आली आहे. ज्यामुळं ऐन दिवाळीनंतर प्रवास दर निम्मे होणार असल्याची चिन्हं असल्याचं सांगण्यात येत आहे. याचाच अर्थ असा, की विमान प्रवासासाठी कमीत कमी पैसे मोजावे लागणार आहेत. 


जर तुम्ही कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर थोडी प्रतीक्षा करा. कारण, दिवाळी नंतर विमान प्रवास रेल्वे प्रवासापेक्षा स्वस्त होण्याचे संकेत आहेत. तशी ऑफर विमान कंपन्या देत आहेत. विमानाचे आगाऊ बुकिंग केल्यावर लोकांना रेल्वेपेक्षा स्वस्त विमान प्रवासाची ऑफर मिळतेय त्यामुळे ही ऑफर हातची जाऊ द्यायची नाहीये, यासाठीच आता अनेकजण प्रयत्नशील दिसत आहेत.