तेजपूर : ईशान्य भारतात आलेल्या पुरात बळी पडलेल्यांचा आकडा ८० वर गेलाय. गेल्या काही दिवसांत ईशान्येकडच्या अरुणाचलप्रदेश, आसाम आणि मणिपूरमधल्या 58 जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. नागालँडमध्येही अतिवृष्टीमुळे पूरस्थिती आहे. दिमापूर जिल्ह्यात झुबझा नदीला पूर आलाय. यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. 


केंद्रीय ईशान्य भारत विकासमंत्री जितेंद्र सिंग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. बचाव आणि मदतकार्यात केंद्र सरकार राज्य सरकारांना संपूर्ण सहकार्य करत असल्याचं सिंग यांनी म्हटलंय. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी हेलिकॉप्टरमधून पुराची पाहणी केली.