Budget 2022 for Health | अर्थमंत्र्यांकडून `राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम`ची घोषणा
Budget 2022 healthcare sector / Telemental health program : अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी `राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम` सुरू करण्याची घोषणा केली.
नवी दिल्ली : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या भाषणादरम्यान त्यांनी विविध क्षेत्रांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोक मानसिक तणावातून जात आहेत. अशा परिस्थितीत जनतेचे मानसिक आरोग्य लक्षात घेऊन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली. या कार्यक्रमातून लोकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या आजच्या जीवनात लोकांसाठी खूप सामान्य झाल्या आहेत. बहुतेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या तणावामुळे या समस्येतून जात आहेत.
राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ कार्यक्रम
नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम सुरू केला जाईल. यासाठी आयआयटी बंगळुरू सरकारला मदत करेल. या कामात आयआयटी सरकारला तांत्रिक मदत करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, आमच्यासमोर अजूनही कोरोनाच्या नवीन वेरिएंटचे ओमिक्रॉन लाटेचे आव्हान आहे. आमच्या लसीकरण मोहिमेच्या वेगामुळे आम्हाला कोरोनाच्या लढाईत यश मिळत आहे.
राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ कार्यक्रम लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो
अजूनही आपल्या देशातील बहुतेक लोक मानसिक आजारांना गंभीर समस्या मानत नाहीत. हा आजार अनावश्यक मानून किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडे जाण्यास संकोच वाटल्याने तो त्याबद्दल लोकांशी बोलणे टाळतो.
आता नॅशनल टेली-मेंटल हेल्थ प्रोग्राम तुम्हाला कुठेही आणि केव्हाही तज्ञांकडून मानसिक आरोग्य समुपदेशन मिळविण्यात मदत करेल. एनसीबीआयच्या मते, टेली-मेडिसिनमध्ये, रुग्णाला टेलिफोन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, इंटरनेट इत्यादीद्वारे तज्ञांचा सल्ला मिळू शकतो. सरकारच्या या निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टम
लोकांसाठी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य सेवाही सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य पुरवठादार आणि आरोग्य सुविधांच्या डिजिटल रजिस्ट्री, विशिष्ट आरोग्य ओळख आणि आरोग्य सुविधांमध्ये सार्वत्रिक प्रवेश यांचा समावेश असेल. हे शेतकरी आणि विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल.