मुंबई : देशातील आघाडीची फास्ट ऑनलाइन फूड ऑर्डर आणि डिलिव्हरी कंपनी आता कर्मचाऱ्यांना एक मोठी सुविधा देत आहे. स्विगीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी उत्तम ऑफर आणल्या आहेत, ज्या अंतर्गत कंपनी प्रथमच आपल्या कर्मचार्‍यांना अनोख्या ऑफर देत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या पॉलिसीचं नाव 'मूनलाइटिंग पॉलिसी' (Moonlighting) आहे.


जाणून घ्या 'मूनलाइटिंग' पॉलिसी काय आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्विगी तुम्हाला 'मूनलाइटिंग' पॉलिसी ऑफर करत आहे, ज्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना दोन ऑफिसमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. स्विगी कंपनीचे म्हणणे आहे की, ते उद्योगात अशा प्रकारचे पहिले 'मूनलाइटिंग' पॉलिसी घेऊन येत आहे. या अंतर्गत कर्मचारी इतर कामांवर किंवा इतर प्रकल्पांवर काम करू शकतात.


म्हणजेच काय तर, जवळ-जवळ सर्वच कंपनीची ही पॉलिसी असते की, त्यांचा कर्मचारी दुसऱ्या कोणत्या कंपनीमध्ये काम करु शकत नाही, केवळ कंपनीच नाही तर तो कर्मचारी दुसरं कोणतंही पैसे कमावण्याशी संदर्भात काम करु शकत नाही.


परंतु स्विगी या नवीन धोरणांतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांना दुसरे काम करण्याची मुभा देते. ते सध्याच्या कंपनीच्या काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून त्यांच्या प्राथमिक नोकरीच्या कामाच्या तासांव्यतिरिक्त दुसरी नोकरी करू शकतात. म्हणजेच त्यांना एकाच वेळी दोन नोकऱ्यांचा लाभ घेता येऊ शकतो.


याबाबत माहिती देताना स्विगीने म्हटले आहे की, 'या पॉलिसीमध्ये अशा कामांचा समावेश आहे जे ऑफिसनंतर किंवा साप्ताहिक सुट्ट्यांमध्ये करता येतात. परंतु याचा त्यांच्या स्विगीमध्ये करत असलेल्या कामावर परिणाम होऊ नये किंवा स्विगीच्या व्यवसायाबाबत हितसंबंधांचा संघर्ष होऊ नये असे स्विगिने सांगितले आहे.


तसेच स्विगीने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची गरज दूर करून कायमस्वरूपी कुठूनही काम करण्याची सुविधा देखील दिली आहे.