मुंबई : देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे फूड डिलिव्हरी करणाऱ्या एक्झिक्युटिव्हसोबत असा प्रकार घडला ज्याचा त्याने विचार देखील केला नसावा. पश्चिम दिल्लीतील टिळक नगर येथे राहणाऱ्या ऑन-ड्युटी फूड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हच्या हत्येप्रकरणी बुधवारी पहाटे एका 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही प्रकरण एका सिगरेटमुळे सुरु झालं. अटक झालेला तरुण आणि एका वक्तीने या फूड डिलिव्हरी करणाऱ्या एक्झिक्युटिव्हसोबत भांडण केलं होतं आणि हे भांडण सिगरेटवरुन सुरु झाल्याचं कथीतपणे समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पोलिसांनी आरोपीची ओळख हर्षदीप सिंग (२२) अशी केली आहे, जो चंदर विहारचा रहिवासी आहे आणि तो वेल्डर आहे. आरोपींकडून हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


पोलिसांनी असेही उघड केले की, ते आणखी एका आरोपीचा शोध घेत आहेत, ज्याची ओळख पटली आहे आणि त्याला लवकरच अटक केली जाईल.


अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना बुधवारी 12.30 am वाजता घडली. भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.


पोलिस उपायुक्त (पश्चिम) घनश्याम बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडित हा फूड डिलिव्हरी मॅन होता. तो जेवण देण्यासाठी एका घराबाहेर थांबला होता, तेव्हा दुचाकीवरून दोन व्यक्ती त्या भागात आले आणि त्यांच्यासोबत भांडण झाले. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या छातीच्या डाव्या बाजूला चाकूने वार करून त्याचा खून केला.


पोलिसांनी या हत्ये मागचा हेतू स्पष्ट नसल्याचे सांगितले. आरोपी आणि पीडिता एकमेकांना ओळखत नव्हते की मृत व्यक्ती अन्न वितरणाची वाट पाहत असताना धूम्रपान करत होता. त्यावर दोन्ही आरोपींनी आक्षेप घेतल्याने त्या लोकांमध्ये हाणामारी झाल्याची शक्यता असल्याचे सांगितले.