Retirement Planning: 3 जबरदस्त योजना, `साठी`नंतरचं आजच करा प्लॅनिंग
रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी काही खास जोजना आहेत. यात सरकारी आणि सोबतच मार्केट लिंक योजनांचाही समावेश आहे
Retirement planning: मार्केटच्या जोखमींपासून दूर राहून रीटायरमेंटसाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी काही खास जोजना आहेत. यात सरकारी आणि सोबतच मार्केट लिंक योजनांचाही समावेश आहे. यामध्ये चांगला परतावा तर मिळेलच सोबतच कम्पाउंडिंग इंट्रेस्टचाही फायदा होऊ शकतो. त्यामुळे जेवढं लवकर प्लॅनिंग कराल तेवढा अधिकच फायदा. या लेखात आपण जाणून घेणार आहोत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), व्हॉलेंटरी प्रॉव्हिडंट फंड (VPF) आणि इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम ( ELSS ) बाबत.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund)
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजनेची तुम्ही बँकेत किंवा पोस्टात चौकशी करू शकतात. ही योजना सुरु करण्यासाठी केवळ 500 रुपयांची गरज लागते. यामध्ये दरवर्षी बँकेत कमीत कमी पाचशे रुपये गुंतवणूक करणं गरजेचं आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी तुम्ही जास्तीत जास्त दीड लाखांची गुंतवणूक करू शकतात. ही योजना 15 वर्षांसाठी आहे. 15 वर्षानंतर तुम्ही ही योजना 5- 5 वर्षांसाठी वाढवू शकतात. PPF योजना 15 वर्षांपर्यंत बंद करता येत नाही. मात्र तुम्हाला तीन वर्षानंतर PPF खात्याच्या बदल्यात कर्ज मिळू शकतं. गरजेचं असल्यास 7 व्या वर्षानंतर नियमांप्रमाणे यातील काही पैसे काढूही शकतात. सध्या PPF वर तुम्हाला 7.1% व्याज मिळतं. यामधील गुंतवणुकीवर तुम्हाला 80C अन्वये करसवलत देखील मिळते.
व्हॉलेंटरी प्रॉव्हिडंट फंड ( Voluntary Provident Fund )
Employee Provident Fund (EPF) म्हणजेच कर्मचारी भविष्य निधीमध्ये तुम्ही तुमच्या पगाराच्या 12% काँट्रीब्युट करू शकतात. मात्र व्हॉलेंटरी प्रॉव्हिडंट फंड (VPF) मधील गुंतवणुकीवर सीमा नसते. एखाद्याला त्यांच्या हातात येणाऱ्या पगारातील हिस्सा कमी करून VPF मध्ये गुंतवणूक करायची असल्यास ते यामाध्यमातून शक्य आहे. EPF चं एक्सटेंशन म्हणून VPF कडे पाहिलं जातं. तुमच्या कंपनीच्या HR च्या माध्यमातून तुम्ही VPF मध्ये गुंतवणूक करू शकतात. कंपनी बदलल्यास हे खातंही ट्रान्स्फर केलं जाऊ शकतं. मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न यासाठी यामाध्यमातून कर्जही मिळू शकतं. यामधील गुंतवणुकीवर तुम्हाला 80C अन्वये करसवलत मिळते. मॅच्युरिटीनंतर यातील गुंतवणूक आणि त्यावरील व्याज हे करमुक्त असतं. रिटायरमेंटसाठी ही चांगली योजना आहे.
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम ( Equity linked savings scheme )
देशातील 42 म्युच्युअल फंड कंपन्या टॅक्स सेव्हिंग स्कीम्स चालवतात. प्रत्येक कंपनीकडे इनकम टॅक्स वाचवण्यासाठी ELSS योजना आहेत. या योजनेमध्ये तुम्ही ऑनलाईन किंवा कोणत्याही एजंटच्या गुंतवणूक करू शकतात. इनकम टॅक्स वाचवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला 5000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला किमान 500 रुपयांची गुंतवणूक करावी लागते. यामाध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त दीड लाखांची करसवलत घेऊ शकतात. यामधील गुंतवणुकीवर कमाल मर्यादा नाही. या गुंतवणुकीवर तुम्हाला व्याज मिळत नाही. मात्र ही योजना मार्केट लिंक्ड असल्याने तुम्हाला परतावाही त्यावेळच्या मार्केटनुसार मिळतो.
कुठली गुंतवणूक सर्वात चांगली?
वरील तिन्ही पर्यायांमध्ये तुम्हाला करामध्ये सवलत मिळते. तुमची स्टेबल नोकरी असल्यास तुम्ही VPF मध्ये गुंतवणूक करू शकतात. कारण तुम्हाला PPF पेक्षा जास्त व्याज यामध्ये मिळू शकतं. तुम्हाला थोडी रिस्क घायची असेल तर तुम्ही ELSS योजनेत गुंतवणूक करू शकतात. SIP च्या माध्यमातून तुम्ही ELSS मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवरील जोखीम कमी होते. मात्र तुम्हाला मार्केट रिस्कपासून दूर राहायचं असल्यास तुम्ही PPF मधेही गुंतवणूक करू शकतात.
( विशेष सूचना - वरील योजनांची माहिती म्हणजे कोणताही गुंवणूकीचा सल्ला नाही. तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करायची झाल्यास योग्य व्यक्ती किंवा आर्थिक सल्लागाराशी बोलून निर्णय घ्यावा. वरील लेखातील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.)
for retirement planning invest in ELSS VPF or PPF scheme know all details