Forbes Asia Top 20 महिला उद्योजकांची यादी जाहीर, भारतातील `या` तिघींचा समावेश
Forbes List : फोर्ब्सच्या 20 आशियाई महिला उद्योजकांच्या यादीत भारतातील तीन महिलांना स्थान मिळाले आहे.
Forbes Asia Power Business Women 2022 : फोर्ब्सने (Forbes) नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या 20 आशियाई महिला उद्योजकांच्या यादीत तीन भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत ज्यांनी कोविड-19 (covid 19) साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमध्ये आपला व्यवसाय वाढवण्यात उल्लेखनीय यश मिळवले.
या तीन महिलांच्या नावांचा समावेश
या यादीमध्ये स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्षा सोमा मंडल (Soma Mandal), एमक्योर फार्माच्या कार्यकारी संचालक नमिता थापर (Namita Thapar) आणि होन्सा कंझ्युमरच्या सह-संस्थापक आणि मुख्य नवोपक्रम अधिकारी गजल अलघ (Ghazal Alagh) यांचा समावेश आहे. फोर्ब्सने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, या यादीतील काही महिला शिपिंग,रिअल इस्टेट आणि बांधकाम यासारख्या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर काही तंत्रज्ञान, औषध आणि कमोडिटी यासारख्या क्षेत्रात प्रयोग करत आहेत. यादीतील इतर महिला ऑस्ट्रेलिया, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान आणि थायलंडमधील आहेत.
सोमा मंडल कोण आहेत?
सोमा मंडल या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) च्या सध्याच्या अध्यक्षा आहेत. 1 जानेवारी 2021 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. सोमा मंडल या सेलच्या पहिल्या महिला कार्यकारी संचालक तसेच पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. कोविड-19 महामारीमध्ये आर्थिक मंदी असूनही कंपनीमध्ये सातत्य आहे.
वाचा : केएल राहुल आणि अथिया शेट्टी अॅडलेडमध्ये असं काहीतरी करतायत; व्हिडीओ आला समोर!
नमिता थापर कोण आहेत
नमिता थापर या एक भारतीय उद्योजक आहेत. ज्या भारतातील मल्टीनॅशनल फार्मसी कंपनी एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. यासोबतच त्या प्रसिद्ध टेलिव्हिजन बिझनेस रिअॅलिटी शो ‘शार्क टँक इंडिया सीझन 1’ च्या जजही राहिल्या आहेत. नमिता थापर या कॉर्पोरेट जगतातील एक मोठी व्यक्ती आहेत.
गझल अलग कोण आहेत
गझल अलघ एक भारतीय इंडस्ट्रिलिस्ट, उद्योगपती आणि कॉर्पोरेट आहे. मामा अर्थ या प्रसिद्ध ब्युटी ब्रँडच्या त्या सह-संस्थापक आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन बिझनेस रिअॅलिटी शो ‘शार्क टँक इंडिया सीझन 1’ च्या जज म्हणूनही त्यांनी काम केले आहे.