११ वेळा श्रीमंतांच्या यादीत सर्वोच्च स्थान मिळवलेला पहिला भारतीय
अंबानी यांची संपत्ती या वर्षी ९.३ अरब डॉलरनं वाढलीय
नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा भारतीय श्रीमंतांच्या यादीत सर्वोच्च स्थान मिळवलंय. सलग ११ व्या वर्षी त्यांनी हे स्थान मिळवलंय, हे विशेष. त्यांची संपत्ती ४७.३ अरब डॉलर इतकी आहे. फोर्ब्स मॅगझिननं ही माहिती दिलीय. अंबानी यांची संपत्ती या वर्षी ९.३ अरब डॉलरनं वाढलीय. यंदाच्या वर्षात ते सर्वात जास्त कमाई करणारे भारतीय ठरलेत. फोर्ब्स इंडियाच्या भारतीय श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी... यंदा त्यांची संपत्ती दोन अरब डॉलरनं वाढून २१ अरब डॉलरवर पोहचलीय.
भारतीय श्रीमंतांची यादी
पहिला क्रमांक - अनिल अंबानी - संपत्ती ४७.३ अरब डॉलर
दुसरा क्रमांक - अझीम प्रेमजी - संपत्ती २१ अरब डॉलर
तिसरा क्रमांक - लक्ष्मी मित्तल - संपत्ती १८.३ अरब डॉलर
चौथा क्रमांक - हिंदुजा बंधु - संपत्ती १८ अरब डॉलर
पाचवा क्रमांक - पालोनजी मिस्री - संपत्ती १५.७ अरब डॉलर
सहावा क्रमांक - शिव नाडार - संपत्ती १४.६ अरब डॉलर
सातवा क्रमांक - गोदरेज कुटुंबीय - संपत्ती १४ अरब डॉलर
आठवा क्रमांक - दिलीप सांघवी - संपत्ती १२.६ अरब डॉलर
नववा क्रमांक - कुमार बिर्ला - संपत्ती १२.५ अरब डॉलर
दहावा क्रमांक गौतम अदाणी - संपत्ती - ११.९ अरब डॉलर
हे वर्ष आव्हानात्मक ठरलं... जेव्हा रुपयाची किंमत घसरली पण श्रीमंत १०० भारतीय आपली संपत्ती वाचवण्यासाठी यशस्वी ठरले. याशिवाय नव्या अरबपतींच्या संख्येतही वाढ झालीय, असं फोर्ब्स आशियाचे संपादक नाजनीन करमाली यांनी म्हटलं.
टक्क्यांच्या हिशोबत सर्वात जास्त संपत्तीत वाढ दिसून आलीय ती बायोटेक उद्योगपती किरण मुजुमदार - शॉ यांच्या संपत्तीत... त्यांची संपत्ती ६६.७ टक्क्यांनी वाढून ३.६ अरब डॉलरवर पोहचलीय. ते श्रीमंतांच्या यादीत ३९ व्या स्थानावर आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, या यादीत केवळ चार महिलांना स्थान मिळवता आलंय.