नवी दिल्ली : वाहन क्षेत्रातील मोठी कंपनी फोर्ड इंडियाने जीएसटी लागू झाल्यानंतर गाड्यांच्या किंमती ४.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंमतीच्या घसरणीची टक्केवारी प्रत्येक राज्यात वेगळी असणार आहे. मात्र सगळ्यात मोठी घट मुंबईत होणार आहे. मुंबईत एसयूव्ही एण्डेवरच्या किंमतीत तब्बल ३ लाख रुपयांपर्यंतची घट होणार आहे. 


फोर्ड इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही विविध श्रेणीमध्ये ४.५ टक्क्यांपर्यंत घट केलीये. दिल्लीमध्ये हॅटबॅक फिगोच्या किंमतीत २००० रुपये तर एसयूव्ही इकोस्पोर्टच्या किंमती ८००० रुपयांपर्यत कमी झाल्यात.


मुंबईमध्ये फिगोच्या किंमतीत २८००० रुपयांपासून ते एण्डेवरच्या किंमतीत तीन लाख रुपयांपर्यंतची घसरण झालीये. ही कंपनी हॅचबॅक फिगोपासून ते प्रीमियम एसयूव्ही एण्डेव्हर या वाहनांची विक्री करते. यांची किंमत ४.६५ लाख रुपयांपासून ३१.५ लाख रुपयांपर्यंत आहे.