बंगळुरु : भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी कर्नाटक निवडणुकीत गडबड झाल्याची शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. येदियुरप्पा यांनी आरोप केली आहे की, कर्नाटकच्या विजयपुरामधील एका गावात वीवीपॅट मशीन बॉक्स सापडले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यांना येदियुरप्पा यांनी पत्र लिहून म्हटलं की, आयोगाला या बाबतीत गंभीर कारवाई केली पाहिजे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रामध्ये त्यांनी हे प्रकरण बेजबाबदार पणाचं असल्याचं म्हटलं आहे. सोबतच त्यांनी विधानसभा निवडणुकीत बेजबाबदारपणा आणि काही गोष्टी कमी असल्याचं निवडणुकीआधीच सांगितलं होतं पण सगळं व्यर्थ गेल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मला विश्वास आहे की, 'निवडणूक आयोग विजयपुराच्या मणगुली गावात एक शेडमध्ये सापडलेल्या वीवीपीएटी मशीनचं प्रकरण गंभीरपणे घेतलं पाहिजे.'



त्यांनी म्हटलं की, हे पहिल्यांदा नाही आहे. निवडणूक आयोग आणि निवडणुकीचं आयोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट निदर्शनात आणून दिलं आहे.