Women started crying for Shivraj singh : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मध्य प्रदेश (MP) आणि राजस्थानमध्ये दोन मोठे डाव खेळले आहेत. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव (Mohan Yadav) यांची नियुक्ती केली असून मागील 17 वर्षापासून मुख्यमंत्री पदावर राहिलेले शिवराज सिंह (Shivraj Singh Chouhan) यांना नारळ देण्यात आला आहे. पक्षाच्या या निर्णयानंतर मंगळवारी शिवराज सिंह चौहान यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला अन् आनंद व्यक्त केला होता. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत होती. अशातच आता शिवराज यांच्या कार्यकर्त्यांना देखील अश्रू अनावर झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मुख्यमंत्री शिवराज यांच्या राजीनाम्यानंतर काही महिला त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. योगायोगाने त्यांची शिवराज यांची भेट झाली. शिवराज यांना भेटत्याच महिला कार्यकर्त्या ढसाढसा रडू लागल्या. शिवराज यांनी त्यांना मिठी मारली. दादा आम्ही तुम्हाला मदतान केलं होतं, असं म्हणत महिलांचे डोळे पाणवाल्याचं दिसून आलं. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देखील भावूक झाल्याचं पहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.



मी येथून निरोप घेत आहे, याचा माझ्या मनात आनंद आहे. आम्ही मागील अनेक वर्षांपासून राज्यातील जनतेची सेवा करत आहे. जनतेने यावेळी पुन्हा आम्हाला संधी दिली आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री बनुन जनतेची सेवा केली. आता एक सामान्य आमदार म्हणून जनतेची सेवा करणार, असं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.  निवडणूक जिंकल्यानंतर तुम्ही दिल्लीला न जाण्याबाबतचं वक्तव्य का केलं होतं? असा सवाल त्यांना केला होता. त्यावेळी, मी पक्ष नेतृत्वकडे काहीतरी मागण्यापेक्षा मरण पत्करेन, असं उत्तर माजी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.


दरम्यान, पुढील वर्षी लोकसभा निवडणुका पार पडणार आहे. त्याआधी आता लिटमस टेस्ट पार पडली. त्यात भाजपने पुन्हा मुसंडी मारल्याचं दिसून आलंय. अशातच आता भाजपने नवा डाव खेळला आहे. भाजपने मध्य प्रदेशात मोहन यादव आणि राजस्थानमध्ये भजन लाल शर्मा या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. अशातच आता भाजपने नेमका गेम प्लॅन तयार केलाय? असा सवाल विचारला जात आहे.