नवी दिल्ली :  देशाचे माजी पंतप्रधान आणि माजी काँग्रेस नेते डॉ. मनमोहन सिंग यांना काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी अनेकांनीच चिंता व्यक्त केली होती. पण, आता मात्र ही चिंता बऱ्याच अंशी शमली आहे, कारण सिंग यांना मंगळवारी म्हणजेच १२ मे रोजी रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

८७ वर्षीय सिंग यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यामध्ये तापाची लक्षणंही आढळली  होती. ज्या पार्श्वभूमीवर सोमवारी त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं या चाचणीतून स्पष्ट झालं.


एम्स रुग्णालयातील Cardio-Thoracic Sciences Centre मध्ये त्यांना निरीक्षणाअंतर्गत ठेवण्यात आलं होतं. अतिदक्षता विभागात डॉ. नितीश नायक यांच्या निरीक्षणाअंतर्गत सिंग यांच्यावर उपचार करण्यात आले होते. दरम्यान,  २००९ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर एम्स रुग्णालयाक कोरोनरी बायपास सर्जरी करण्यात आली होती. वाढतं वय पाहता त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं कळतात अनेकांनी त्यांच्या उत्तर आरोग्यासाठी प्रार्थनाही केल्याचं पाहायला मिळालं. 


 


केंद्रातील विरोधी पक्षाचे नेते असणाऱे डॉ. सिंग हे देशाच्या राजकारणातही सक्रीय आहेत. अनेकदा काही महत्त्वाच्य, विशेष म्हणजे देशाच्या आर्थिक विकासाशी संबंधित बऱ्याच मुद्द्यांवर ते अतिशय महत्त्वपूर्ण मतं मांडत असतात.