TMC चा भाजपला मोठा धक्का; बाबुल सुप्रियोंचा तृणमूलमध्ये प्रवेश
ममता बॅनर्जींच्या जेरीस आणणाऱ्या बाबुल सुप्रियोंचा भाजपला रामराम, अखेर TMC मध्ये प्रवेश
कोलकाता: माजी केंद्रीय मंत्री आणि माजी भाजपचे खासजदार बाबुल सुप्रियो यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. कमळाची साथ सोडून त्यांनी ममता बॅनर्जी यांच्य़ा पक्षाचा हात पकडला आहे. एकेकाळी भाजपमध्ये असताना ममता बॅनर्जी यांच्या नाकीनव आणणारे बाबुल सुप्रियो यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
बाबुल सुप्रियो यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भाजपमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आता TMC मध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा TMC मधील प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का तर तृणमूलसाठी फायद्याचा ठरणार आहे.
जुलै महिन्यात बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाला रामराम केला होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंगालमध्ये भाजपकडून लढणाऱ्या बाबुल सुप्रियो यांनी ममता बॅनर्जींना जेरीस आणलं होतं. त्यामुळे बाबुल सुप्रियो यांच्या TMC मधील प्रवेशानं पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. सुप्रियो यांच्या प्रवेशानंतर आता आणखी काही बदल होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
बाबुल सुप्रियो यांनी जुलै महिन्यात राजकारणातून संन्यास घेण्याबाबत घोषणा केली होती. लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणाची गरज नाही असंही त्यावेळी सुप्रियो म्हणाले होते. राजकारणापासून वेगळं होऊन ते आपलं समाजकारण करू शकतात असंही ते म्हणाले होते. त्यांच्या टीएमसीमध्ये जाण्याने आता पुन्हा खळबळ उडाली आहे.