Fortuner cars Toilet Facilities: एसयूव्हीबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा लोकांच्या ओठावर पहिले नाव फॉर्च्युनरचे पहिले नाव येते. फॉर्च्युनर आपल्याकडे असावी अशी अनेक कारप्रेमींची इच्छा असते. त्यामुळेच फॉर्च्युनर ही भारतातील सर्वाधिक पसंतीची कार ठरली आहे. या कारमध्ये चांगली जागा मिळण्यासोबतच तुम्हाला हायटेक फीचर्सही पाहायला मिळतात. पण तुम्ही कधी एसयूव्ही कारमध्ये बनवलेले टॉयलेट पाहिले आहे का? तुम्ही याआधी याबद्दल कधी ऐकलेदेखील नसेल. पण एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये फॉर्च्युनर कारमध्ये टॉयलेटची सुविधा देण्यात आली आहे. काय आहे हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणाने भन्नाट जुगाड केलाय. या तरुणाने चक्क फॉर्च्युनर कारमध्ये टॉयलेट बनवण्यात आले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटले आहे.


सध्या सोशल मीडियावर फॉर्च्युनर कारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला काळ्या रंगाची फॉर्च्युन कार दिसतेय. व्हिडीओमध्ये तुम्ही कारच्या आत पाहिल्यावर तुम्हाला तिसऱ्या रांगेतील सीटच्या जागी टॉयलेट बांधलेले दिसेल. टॉयलेटसोबतच कारमध्ये पाण्याची टाकीही बसवण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर टॉयलेटमध्ये तुम्हाला जेट स्प्रेसोबत चार्जिंग पॉइंटही पाहायला मिळेल.


लोकांना आवडला व्हिडीओ 



हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर @desimojito नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये 'इनोव्हेशनच्या नावावर काहीही चालू आहे' असे लिहिले आहे. 1लाख 86 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 


व्हिडीओ पाहून यूजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्पीड ब्रेकर या संशोधनाची वाट लावेल, असे एका युजरने म्हटले आहे. आणखी एका यूजरने लिहिले - भाऊ, आता छतावर गार्डन बनवा. तर हे सुलभ टॉयलेट आहे ज्याची किंमत 50 लाख रुपये आहे, असे दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे.