सोशल मीडियावरचं प्रेम पडलं महागात, तरुणीला लग्नासाठी बोलावलं आणि... नक्की हे प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या
आधी प्रेम नंतर लग्नाचं आमिश... सोशल मीडियावरील प्रेम तरुणीला असं पडलं महागात
Crime News : सोशल मीडियावर झालेल्या प्रेमामुळे फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत. प्रेम आंधळं असं म्हटलं जातं मात्र असच काहीसं प्रकरण समोर आलं आहे. एका तरूणाने स्वतःला पोलीस अधिकारी सांगत तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर एका हॉटेलमध्ये बोलावत तिच्यावर बलात्कार केला. उत्तर प्रदेशमधील फिरोजाबादमधील ही घटना आहे.
नेमकं काय आहे प्रकरण-
सोशल मीडियावर पीडितेची आणि आरोपी रोहित सिंहसोबत ओळख झाली. रोहितने पीडितेला गोड बोलत लग्नाचं वचन दिलं त्यामुळे पीडितेनेही आरोपी रोहितवर डोळे झाकून विश्वास ठेवला. रोहितने याची खात्री झाल्यावर त्याने तिला दिल्लीला बोलावलं.
पीडित 9 जूनला आसामहून दिल्लीला गेली त्यानंतर रोहितने पहाडगंज इथल्या एका हॉटेलमध्ये नेलं. तिथं गेल्यावर हॉटेलमध्ये खोटी आश्वसान देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
लग्नासाठी बोलावत बलात्कार
रोहितने पाडितेला लग्न करण्यासाठी पुन्हा फिरोजाबाद इथल्या गोल्डन टॉवर या हॉटेलमध्ये बोलावलं. मात्र लग्नाला बोलावलं असताना रोहित पीडितेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करू लागला. पीडितेने नकार दिल्यावर रोहितचं खरं रूप समोर आलं. पीडितेला त्याने मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला.
पीडितेने त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत माहिती दिली. आरोपी रोहितने पीडीतेची चैन, अंगठी, नेकलेस, मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रेही दिली नसल्याचं पीडितेने पोलिसांना सांगितलं.
दरम्यान, पोलिसांनी 392, 376, 342, 323 या कलमांतर्गत आरोपी रोहितला अटक केली आहे.