Light Bill Fraud : सध्या डिजिटल (Digital) व्यवहारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आपन अनेक व्यवहार जसे फोन बिल (Phone bill) भरणे, गॅस बूक करणे, इलेक्ट्रिसिटीचे बिल भरणे अशी सर्व कामे ऑनलाईनच करत असतो. याचपार्श्वभूमीवर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएमएस आला असेल, ज्यामध्ये वीज बिल ( Electricity Bill ) न भरल्यास तुमच्या घराची वीज खंडित होईल... तर अजिबात घाबरू जाऊ नका. कारण असा मेसेज हॅकर्सद्वारे (fake SMS) पाठवला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मेसेजमध्ये तुम्हाला वीज बिल भरण्यासाठी एक लिंक पाठवली जाते आणि जेव्हा तुम्ही या लिंकवर क्लिक करता तेव्हा तुमच्या बँक खात्यातून पैसे रिकामी होतात. त्यामुळे तुम्हाला लाईट बिल, कॅशबॅक किंवा ऑफर मागणारा कोणताही मेसेज आला तर काळजी घ्या. असे मेसेज टाळण्याचा सल्ला सायबर तज्ञ देत आहेत. नुकतेच एसबीआयनेही (SBI Tweet) ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ही फसवणूक कशी टाळता याबाबत जाणून घ्या...


तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर अशी घ्या काळजी


अनेक युजर्सना व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) किंवा एसएमएस (SMS) किंवा अनोळखी नंबरवरून मेसेज येत आहेत. ज्यामध्ये त्यांनी ताबडतोब फोन न केल्यास त्यांचे वीज (Light Bill) कनेक्शन खंडित होईल, असे लिहिलेले असते. एक मेसेज समोर आला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की प्रिय ग्राहक तुमचं वीज आज रात्री 8.30 वाजता खंडित होईल. कारण तुमचे मागील महिन्याचे बिल अपडेट केलेले नाही. कृपया या क्रमांकावर त्वरित संपर्क साधा, असे या संदेशात लिहिले आहे. धन्यवाद....


SBIने दिला इशारा 


असे मेसेज आल्यानंतर अनेक यूजर्सनी हा मेसेज ट्विटर आणि अनेक सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर एसबीआयनेही (SBI) आपल्या वतीने लोकांना या बनावट मेसेजपासून सावध राहण्यास सांगितले आहे. अशा एसएमएसवर कधीही कॉल बॅक किंवा एसएमएस करू नका, असे ट्विटमध्ये लिहिले आहे. कारण ते तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती चोरण्याचे साधन असू शकते.



फेक मेसेज कसा ओळखाल?


जर तुम्हाला वीज बिल भरण्यासाठी हॅकर्सकडून फेक मेसेज आला असेल तर, एकतर त्या मेसेजमध्ये भाषेचा वापर चुकीच्या पध्दतीने केला जातो. फेक मेसेज वाचताना तुमच्या लक्षात देखील येईल. तसेच मेसेजमध्ये स्वल्पविराम जास्त दिसतील आणि कॅपिटल अक्षरे आणि स्मॉल-कॅप अक्षरे समजून घेण्याची पूर्ण कमतरता दिसेल. असा प्रकारचे मेसेज आले तर चुकून पण त्यावर क्लिक करू नका.


वाचा : Petrol-Diesel भरायला जाण्याआधी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर  


फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय करावं?


- महावितरणकडून केवळ नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे एसएमएस पाठवले जातात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा MSEDCL (उदा. VM- MSEDCL, VK- MSEDCL) असा असतो. त्यामुळं याशिवाय कोणत्याही वैयक्तिक क्रमांकावरून आलेल्या एसएमएसला प्रतिसाद देऊ नये.


- वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून आलेल्या बनावट एसएमएसना प्रतिसाद देऊ नये, तसेच यावरील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.


- महावितरण MSEDCL शिवाय कोणतंही एप डाउनलोड करायला सांगत नाही. त्यामुळं वीज बिल भरण्यासाठी लिंक किंवा कोणतंही सॉफ्टवेअर डाउनलोड करू नये.


- वीज बिल भरण्यासाठी महावितरणकडून कोणत्याही प्रकारचा कॉल केला जात नाही, त्यामुळं अशा फेक कॉलला बळी पडू नये.