दरवर्षी मिळणार 2 LPG सिलिंडर मोफत, सरकारने केली मोठी घोषणा; PNG -PNGही स्वस्त
Ujjwala Yojana: दिवाळीपूर्वी सीएनजी (CNG) आणि पीएनजीवरील (PNG) व्हॅट 10 टक्क्यांनी गुजरात सरकारने कमी केला आहे. याशिवाय, उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Scheme) लाभार्थ्यांना दरवर्षी दोन सिलिंडर (LPG Cylinders) मोफत देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
Free LPG Cylinders: दिवाळीपूर्वी गुजरात सरकारने राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे. गुजरात सरकारच्या या निर्णयामुळे कोट्यवधी लोकांना याचा लाभ मिळणार आहे. दिवाळीपूर्वी सीएनजी (CNG) आणि पीएनजीवरील (PNG) व्हॅट 10 टक्क्यांनी गुजरात सरकारने कमी केला आहे. याशिवाय सरकारने उज्ज्वला (Ujjwala Scheme) योजनेच्या 38 लाख लाभार्थ्यांना दरवर्षी दोन सिलिंडर (LPG Cylinders) मोफत देण्याची घोषणा केली आहे.
सरकारवर 1,650 कोटी रुपयांचा बोजा
केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Scheme) लाभार्थ्यांना दरवर्षी सीएनजी पाईपद्वारे घरोघरी पोहोचणाऱ्या नैसर्गिक वायूवरील (PNG) व्हॅटमध्ये कपात आणि दोन मोफत एलपीजी सिलिंडरमुळे राज्य सरकारवर 1,650 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने ही घोषणा केली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीचे हे गाजर आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
व्हॅट 15 वरुन 5 टक्क्यांवर खाली आणला
गुजरातचे मंत्री जितू वाघानी यांनी सांगितले, 'सरकारने CNG आणि PNG वरील VAT 10 टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे गृहिणी महिला, रिक्षाचालक आणि सीएनजी चालवणाऱ्या वाहनांचा वापर करणाऱ्यांना मदत होणार आहे. गुजरातमध्ये स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या सीएनजी आणि पीएनजीवर 15 टक्के व्हॅट होता. या बदलानंतर आता व्हॅट ५ टक्क्यांवर आला आहे.
यामुळे सीएनजीचे दर प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीचे दर 5 रुपये प्रति घनमीटरने कमी होतील, असे ते म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकांच्या बिलात मोठा फरक दिसून येणार आहे.