नवी दिल्ली : रेशनकार्ड धारकासांठी महत्त्वाची बातमी आहे. शासनाने मोफत रेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सर्वसामांन्याना झटका लागू शकतो. शासनाकडून यंदा गहूऐवजी तांदूळ दिले जाऊ शकतात. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 19-30 जूनदरम्यान मोफत अन्न (Free Ration Update) योजनेनुसार गहूऐवजी 5 किलो तांदूळ देण्यात आले. शासनाकडून आता यावेळेस गहूऐवजी तांदूळ दिले जाऊ शकता. त्यामुळे सर्वसामांन्याना कदाचित गहू मिळणार नसल्याची शक्यता आहे. याआधीही अन्न आणि औषध विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत. (free ration pm garib kalyan anna yojana rice wheat)


गहूऐवजी तांदूळ मिळणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत मोफत रेशन योजनेनुसार, रेशनधारकांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिले जात होते. मात्र शासनाने काही वेळा गहूऐवजी तांदूळ दिले होते. अन्न पुरवठा विभागाच्या आयुक्त्यांच्या आदेशानुसार, यावेळेस लाभार्थ्यांना गहूऐवजी फक्त 5 किलो तांदूळ देण्यात आले.


उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये गहूचं वाटप आणि वितरण कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भविष्यातही शासनाकडून गहूऐवजी तांदळाचा पुरवठा केला जाऊ शकतो.


नक्की कारण काय?


गव्हाच्या कमी खरेदीमुळे सरकार पुन्हा एकदा रेशन कोट्यातील गव्हाचे प्रमाण कमी करण्याचा विचार करू शकते. यापूर्वीही सरकारने मोफत रेशनमधून गव्हाऐवजी तांदूळ वाटप केलं होतं. हा बदल फक्त प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) साठी करण्यात येत आहे. याआधीही सरकारने गव्हाऐवजी सुमारे 55 लाख मेट्रिक टन तांदळाचं अतिरिक्त वाटप केलं होतं.