FREE TRAVELIING DESTINATIONS INDIA: जर तुम्हाला फिरण्याची आवड आहे तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. बऱ्याचदा नुसती आवड असून फायदा होत नाही फिरण्यामध्ये बरेच पैसे खर्च होतात आणि जर बजेट नसेल तर फिरण्याचा प्लॅन कॅन्सल करावा लागतो. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं कि आता फ्री मध्ये फिरा,फ्री मध्ये खा.प्या मजा करा तर? हो भारतात काही अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही फ्रीमध्ये फिरू शकता (FREE TRAVELLING )राहू शकता आणि सहलीचा आनंद घेऊ शकता.त्यामुळे आता बजेट नसेल तर नाराज होण्याची गरज नाहीये,तुम्ही बिनधास्त ट्रिप प्लॅन करू शकता.चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ही ठिकाणं..


मणिकरण साहिब गुरद्वारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचल प्रदेशमध्ये फिरण्याचं प्लांनिंग करत असाल तर माणिकरण साहिब गुरुद्वारा (Manikaran Sahib Gurudwara)  या ठिकाणी जाऊन राहू शकता.इथे तुम्हाला फक्त जेवणच नाही तर राहणं आणि पार्किंग सुद्धा अगदी मोफत दिल जात आहे. त्यामुळे जर तुम्ही गाडी घेऊन जाणार असाल तरी पार्किंग च टेन्शन घ्यायची गरज नसणार आहे त्यामुळे हे एक उत्तम ठिकाण आहे.


 
आनंद आश्रम 


जर तुम्ही केरळला फिरायला जाण्याचा प्लॅन आखात असाल तर आनंद आश्रम (Anand ashram)  हे एक बेस्ट ठिकाण आहे जिथे तुम्ही राहू शकता.यातील खासियत म्हणजे इथे जे जेवण बनवलं जात ते अगदी कमी तेलात आणि कमी मसाल्यांचा वापर करून बनवलं जात त्याचा फायदा असा कि याने आपल्या पोटातच त्रास देखील होणार नाही आणि आरोग्य देखील उत्तम राहील 


गीता भवन


ऋषिकेश ही जागा अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहे जर  ऋषिकेश फिरायला जाणार असाल तर गीता भवन मध्ये जरूर थांबा . गीता भवन हा आश्रम खूप मोठा आहे जवळपास हजार खोल्यांचा हा आश्रम आहे इथे सत्संग आणि योगा सेशनसुद्धा घेतले जातात .आणि मुख्यतः गंगा नदीच्या काठावर हा सुंदर आश्रम आहे त्यामुळे एक वेगळा अद्भुत अनुभवदेखील तुम्हाला मिळतो 


ईशा फाउंडेशन


इशा फाउंडेशन कोयम्बतूर पासून 40  किमी  दूर आहे इथे भगवान शंकरांची सुंदर मूर्ती आहे हे नक्कीच तुमचं मन मोहून टाकते या ठिकाणी राहण्याची खूप छान सोय आहे त्याचसोबत जर तुम्हाला इथे काही दान करायची इच्छा असेल तर तेही तुम्हीव स्वइच्छेने करू शकता..