नवी दिल्ली : 1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार असल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरांनी सांगितलं. त्याचप्रमाणे 45 पेक्षा जास्त वय असलेल्या व्याधीग्रस्तांनाही प्राधान्य दिलं जाणार आहे. ही लसीकरण मोहीम 10 हजार सरकारी आणि 20 हजार खाजगी केंद्रावर राबवली जाणार आहे. सरकारी केंद्रावरची लस मोफत असणार. देशात लसीकरणाला सुरूवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासगी रुग्णालयातही लस विकत घेता येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, राज्यात आता पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा सुरू झाली आहे. राज्यात 24 तासांत कोरोनाचे 8 हजार 807 रुग्ण, तर तब्बल ८० जणांचा मृत्यू, मुंबईत 1167 रुग्ण वाढले, पुणे, नागपूर आणि अमरावतीतही कोरोना व्हायरसने हाहा:कार माजवला आहे. 
 



जानेवारीच्या सुरूवातीला घसरणीला लागलेल्या कोरोनानं फेब्रुवारी मध्यापासून पुन्हा डोकं वर काढलंय... निर्बंधांमध्ये आलेली शिथिलता हे कोरोनावाढीचं कारण मानलं जातंय. मात्र तरीही जगाच्या तुलनेत भारतात अजूनही कोरोनाचं प्रमाण कमीच आहे. कोरोना वाढत असला तरी ९५ टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणंच आढळतायत. कोरोनाची जनुकीय रचना देखील बदलली आहे. त्यामुळं संसर्ग वाढला तरी मृत्यूदर कमी झाला आहे..