Friends Killed Minor: लहान मुलांमध्ये व्हिडीओ गेम्सचे प्रमाण धोकादायक बनत चालले आहे. गेम्सच्या नादात आपण क्रूरतेकडे कसे जात आहोत, हे त्यांना कळतही नाही. याच कारणाने एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असलेला फ्री फायर गेम एका अल्पवयीन मुलाच्या हत्येचे कारण ठरला आहे. या घटनेत 4 मित्रांनी मिळून अल्पवयीन मुलाची हत्या केली आहे. कुठे आणि कशी घडली ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्री फायर गेमच्या आयडीवरुन मित्रांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कालांतराने हा वाद इतका विकोपाला पोहोचला की 4 मित्रांची अल्पवयीन मुलाची हत्या करण्यापर्यंत मजल गेली. पापई दास असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. हा मुलगा फरक्का बॅरेज हाऊसिंग, मुर्शिदाबाद येथील रहिवासी आहे. झी न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.


अल्पवयीन मुलगा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता. सगळीकडे त्याच्या शोध घेतला जात होता. त्यानंतर 15 जानेवारीला अल्पवयीन मुलाचा मृतदेह  तारखेला फिडर घाटाला लागून असलेल्या जंगलात सापडला.  यानंतर पोलिसांनी मृताच्या चार मित्रांची चौकशी सुरू केली. सुरुवातील कोणीच हत्या केल्याचे मान्य करायला तयार नव्हते. पण पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर चौकशीत सत्य बाहेर आले. 


पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. यामागे आणखी कोणाचा हात आहे का? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.चार मित्रांनी अल्पवयीन मुलाची हत्या केली.  धक्कादायक म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह जाळला. पोलिसांनी आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे.