बिकानेर : ही घटना तुम्हाला अतिशय फिल्मी वाटू शकते, पण तुम्ही ही संपूर्ण घटना वाचल्यानंतर नक्कीच म्हणाल, अनोळखी व्यक्तीसी चॅट करणे सोशल मीडियावर किती घातक ठरू शकतं. हॅलो...क्या आप मुझसे दोस्ती करोगे? मेरा नाम 'चाहत' है, और मैं आप के शहर मैं रहती हूँ. एका 58 वर्षीय नंदकिशोर (बदलेलं नावं) व्यक्तीला सोशल मीडियावर हा मेसेज 'चाहत'ने पाठवला. चाहतसोबत नंदकिशोर यांची मैत्री झाली. नंदकिशोर आणि चाहत यांच्यात चॅटिंगचा हा सिलसिला सुरु झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नंदकिशोर यांना अभीभी मैं जवान हूँ, असा समज एक नाही सतत २ वर्ष येत राहिला. कारण चाहत २ वर्षापासून त्यांच्यासोबत चॅट करत होती. पण याच दरम्यान चाहतने नंदकिशोर यांना ८ लाखाचा चूना लावला.


या प्रकरणाचा भंडाफोड तेव्हा झाला जेव्हा, नंदकिशोर चाहतकडून उसनवारसारखे दिलेले पैसे परत मागून थकला. तेव्हा नंदकिशोर यांनी बिकानेरच्या सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.


पोलिसांनी हे प्रकरण उघड केलं तेव्हा लक्षात आलं की, नंदकिशोरसोबत चॅट करणारी चाहत ही मुलगी नव्हती तर तो मुलगा होता. गंमत म्हणजे तो मुलगा नंदकिशोरच्या मुलाचा मित्र होता. पोलिसांनी या प्रकरणी 21 वर्षाच्या मानसिंह सेंगर यांना अटक केली आहे. 


मानसिंह या आधी नंदकिशोर यांच्या मुलासोबत शिकत होता. तो त्यांच्या घरी येत जात असे, म्हणून तो नंदकिशोर यांच्या परिवाराला चांगला ओळखत होता. याचाच फायदा घेत त्याने नंदकिशोर यांना फसवण्याची स्क्रीप्ट लिहिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाहतची बहिण (मानसिंह सेंगर)ची बहिणीने देखील नंदकिशोर यांना सोशल मीडियावर मेसेज करुन मैत्रीची ऑफर केली होती. नैनाच्या एका मेसेजने एकेदिवशी नंदकिशोर यांना मोठा धक्का बसला. 


जेव्हा तिने सांगितलं की, चाहतचा मृत्यू झाला आहे. नंदकिशोर आता नैनासोबत चॅट करु लागले, मग ते अधिक जवळ येऊ लागले आणि या प्रकारे नैना आणि नंदकिशोर यांच्या चॅटिंगमध्ये नंदकिशोरला नैनाने ८ लाखाच चूना लावला.