मुंबई : जर तुम्ही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. कारण इथे कामापासून अनेक लहान ते मोठ्या रिक्त पदांची माहिती तुम्हाला आम्ही देणार आहोत, ज्यासाठी तुम्ही येत्या काळात अर्ज करू शकता. काही विभाग आणि कंपन्या या आठवड्यापर्यंत अर्ज प्रक्रिया बंद करतील, तर सरकारी क्षेत्रांव्यतिरिक्त, टेक जायंट अ‍ॅमेझॉन देखील आपल्या व्हर्च्युअल करिअर फेअरद्वारे सुमारे 55 हजार जागांवर नोकऱ्या देणार आहे.


DRDO CAIR ची JRF भर्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने बेंगळुरू येथील सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स (CAIR) मध्ये ज्यूनिअर रिसर्च फेलो भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यापदाची निवड 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वॉक-इन मुलाखतीच्या आधारे केली जाईल.


मुलाखत फेरीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना सुरुवातीला दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाईल. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज jrfcair2021@gmail.com वर 08 ऑक्टोबर 2021 पर्यंत पाठवणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी DRDO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.


अमेझॉन करियर डे फेअर


खासगी क्षेत्रातील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी अमेझॉन 16 सप्टेंबर रोजी भारतात पहिल्यांदाच वर्चुअल करिअर मेळाव्याद्वारे नोकरी शोधणाऱ्यांना मोठी संधी प्रदान करणार आहे.


टेक कंपनी आपल्या करिअर मेळ्यात कॉर्पोरेट, टेक आणि ऑपरेशन्स पदांसाठी 55 हजार उमेदवारांची भरती करेल. या करियर फेअरमध्ये कोणीही कोणत्याही शुल्काशिवाय सहभागी होऊ शकतो.


जॉब सर्च प्रक्रिया, रेझ्युमे-बिल्डिंग कौशल्ये आणि मुलाखत कौशल्ये कशी शिकावी आणि हे कसे सुधारता येतील याविषयी उमेदवार मार्गदर्शन मिळवू शकतील. या करिअर फेअर इव्हेंट अॅमेझॉन करिअर डे पोर्टलसाठी उमेदवार https://www.amazoncareerday.com/ या वेबसाईटवरुन ऑनलाइन अर्ज किंवा प्री-रजिस्टर करु शकतात असे करण्यासाठी कोणतीही अधिकृत वेळ मर्यादा नाही.


CGPSC प्राध्यापक पदांसाठी भरती


छत्तीसगड लोकसेवा आयोगाने (CGPSC) राज्याच्या उच्च शिक्षण विभागात 595 प्राध्यापक पदांच्या नियुक्तीसाठी अर्ज जाहीर केले आहेत. ऑनलाईन अर्ज 13 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12 पासून अधिकृत वेबसाइट psc.cg.gov.in वर सुरू होईल.


रिसर्च किंवा शिक्षणक्षेत्रात 10 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवाराला रिसर्चच्या रेकॉर्डसह पीएचडी पदवी असणे आवश्यक आहे. हे उमेदवार 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज करण्यास पात्र आहेत.


RSMSSB संगणक भरती


राजस्थान अधीनस्थ कर्मचारी आणि मंत्री सेवा निवड मंडळ (RSMSSB) लेखी परीक्षेद्वारे 250 संगणक (कंप्यूटर चालक) पदांची भरती करणार आहे. पात्र उमेदवार RSMSSB च्या अधिकृत वेबसाइट rsmssb.rajasthan.gov.in द्वारे 08 ऑक्टोबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. इच्छुक उमेदवारांकडे गणित किंवा अर्थशास्त्रात पदवी असणे आवश्यक आहे आणि कंप्यूटरमध्ये डिप्लोमा धारक असणे आवश्यक आहे.


सिक्कीम लोकसेवा आयोग भरती


सिक्कीम पब्लिक सर्व्हिस कमिशनने (SPSC) www.spscskm.gov.in या अधिकृत पोर्टलवर मत्स्यपालन अधिकारी आणि मत्स्यपालन रक्षकांची भरती अधिसूचित केली आहे. मत्स्यपालन अधिकारी पदासाठी 11 आणि मत्स्य रक्षक पदासाठी 13 रिक्त जागा उपलब्ध केल्या आहेत.


संबंधित शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार 15 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सिक्कीम लोकसेवा आयोगाच्या वेबसाइट www.spscskm.gov.in वर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.


NHPC इंडिया भर्ती


नॅशनल हायड्रो-इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) लिमिटेड ने त्याच्या अधिकृत वेबसाइट nhpcindia.com वर विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. सिनिअर मेडिकल ऑफिसर, असिस्टेंट राजभाषा ऑफिसर, जेई (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल) आणि वरिष्ठ लेखापाल या पदांसाठी एकूण 173 रिक्त जागा उपलब्ध आहेत.


30 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. या पदाची निवड संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल. अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी, कोणीतरी अधिकृत वेबसाइट nhpcindia.com ला भेट देऊ शकतात.