Big Bull राकेश झुनझुनवालांनी 5000 रूपयांपासून सुरूवात करत असा गाठला 32000 हजार कोटींचा टप्पा
शेअर मार्केटमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी 36 वर्षांपूर्वी त्यांचा प्रवास सुरू केला होता.
Big Bull Rakesh JhunJhunwala Market Sucess Story: शेअर मार्केटमधील नावाजलेले बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने सगळीकडून दुःख व्यक्त केले जात आहे. ते 62 वर्षांचे होते.
शेअर मार्केटमधील गुंतवणूकीतले ते गुरू होते असं म्हणायला हरकत नाही. शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी हे त्यांनी जगाला शिकवले. काही दिवसांपुर्वी त्यांची अकासा ही विमानसेवाही सुरू करण्यात आली आहे. शेअर मार्केटमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी 36 वर्षांपूर्वी त्यांचा प्रवास सुरू केला होता.
1985 साली त्यांची पहिली गुंतवणूक होती फक्त 5000 रूपये परंतु आज त्यांची एकूण संपत्ती जवळपास 40 हजार कोटींच्या आसपास पोहचली आहे. ज्यावेळी राकेश झुनझुनवाला यांनी आपली पहिली गुंतवणूक केली होती त्यानंतर Bombay Stock Exchange Sensex 150 अंकांच्या जवळ पोहचला होता.
त्यावेळी अनेकांनी शेअर मार्केटमध्ये गुतंवणूक कशी करावी आणि त्याचा पुढे फायदा कसा होईल याची फारच कमी माहिती होती तसेच अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी की नाही याबद्दल साशंक होते. पण यावर बगल देत राकेश यांनी एक नवा इतिहास रचला. शेअर मार्केटमध्येही आपण यशस्वी होऊ शकतो हा विश्वास निर्माण केला.
समोर आलेल्या माहितीनुसार 14 ऑगस्ट 2022 रोजी राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती $5.8 अब्ज एवढी नोंदवली गेली. या संपत्तीत शेअर बाजारातील गुंतवणूक आणि रिटर्न्सचा मोठा वाटा होता. त्यांच्या portfolio मध्ये आज 32 shares चा समावेश आहे. ज्यांची value ही 31,904.8 कोटींच्या आसपास आहे.
1986 मध्ये त्यांनी 5 लाख रुपयांचा नफा कमावला. त्यांनी 'टाटा टी'चे 5,000 शेअर्स 43 रुपयांना विकत घेतले होते जे अवघ्या तीन महिन्यांत 143 रुपयांपर्यंत वाढले होते.