मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसचा सर्वत्र प्रादुर्भाव वाढत असतानाच शक्य त्या सर्व परिंनी या विषाणूशी लढण्यासाठी म्हणून आणि त्याच्यापासून दूर राहण्यासाठी म्हणून काही पावलं उचलली जात आहेत. यामध्ये मग प्रतिबंधात्मक उपाय असो किंवा रोजच्या सवयींमध्ये केलेले बदल. याच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता 'फूड सेफ्टी एँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया' अर्थात एफएसएसआय FSSI कडून महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्व आहेत प्लास्टीकच्या सीलबंद पिशवीतून येणाऱ्या दुधासंबंधीची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही आणि घरी दुध पोहोचवायला येणारी व्यक्ती मास्क वापरत आहे ना याची काळजी घेतली जाणं अनिवार्य आहे. याव्तिरिक्त घ्यायची काळजी खालीलप्रमाणे... 


- बाजारातून दुधाची पिशवी घरी आणल्यानंतर ती लगेचच वापरु नका.


- वाहत्या नळाखाली ही पिशवी चांगल्या पद्धतीनं धुवून घ्या. 


- गरज भासल्यास ही पिशवी साबणानं धुवा. 


- दुधाची पिशवी वाहत्या पाण्याखाली धुतल्यानंतर स्वत:चे हातही साबणाने स्वच्छ धुवा. 


- कात्रीच्या सहाय्यानं ही दुधाची पिशवी कापून त्यातील दूध भांड्यात काढून घ्या. 


- दूध पातेल्यात किंवा भांड्यात ओततेवेळी त्यातून पिशवी धुतल्यानंतर त्यावरील पाणी ओघळणार नाही याची काळजी घ्या. 


- पाणी दुधात जाण्यापासून टाळण्यासाठी पिशवी धुतल्यानंतर ती पातेल्यात ओतण्याआधी नीट पुसून घ्या. 


- पाकिटबंद दुधावर प्रक्रिया केलेली असल्यामुळं ते न तापवताच वापरात आणलं तरीही हरकत नाही. 



- पिशवीतील दूध नीट तापवून त्यानंतरच वापरात आणावं.