नवी दिल्ली : देशातल्या इंधनाच्या वाढत्या दरांवर लवकरच तोडगा काढू, असं आश्वासन सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिलंय. याबाबत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर इंधन दराबाबत लवकरच निर्णय घेण्याच्या दृष्टीनं सरकार पावलं उचलेल, असं आश्वासन प्रधान यांनी दिलंय. इंधन दरवाढीमुळे सध्या सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. पेट्रोल आणि डिझेलचे हे सर्वाधिक दर आहेत. मुंबईमध्ये आज पेट्रोल ८४.७० रुपये तर डिझेल ७२.४८ रुपये प्रती लिटर आहे. इंधनाच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आता यावर तोडगा काढण्याचं आश्वासन भाजपकडून देण्यात येतंय.