नवी दिल्ली : या घरी नेण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच काही वेळापूर्वी निधन झालं. एम्स रुग्णालयात वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले ३६ तास ते मृत्यूशी झुंज देत होते. अटलजींच पार्थिव उद्या सकाळी भाजपा मुख्य कार्यालयात आणण्यात येणार आहे तसेच संध्याकाळी ५ वाजता विजय घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


विजयघाटावर स्मारक 


अटलजींच्या स्मारकासाठी दीड एकर जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांच स्मारक उभारण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच अटलजींचे पार्थिव दिल्लीतील त्यांच्या घराकडे रवाना करण्यात आलंय. सर्व भाजप कार्यालयातील झेंडे निम्म्यावर आणण्यात आले आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकरणीची बैठक सध्या स्थगित करण्यात आली आहे.