नवी दिल्ली : भारताचे शहीद जवान औरंगजेब यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. शहीद राईफलमॅनला निरोप देण्यासाठी पूंछमध्ये मोठा जनसागर उसळला होता. मात्र त्यापूर्वीच  अपहरण केलेल्या दहशतवाद्यांनी शहीद औरंगजेब यांचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता यात झाडाखाली बसलेल्या शहीद जवानाला दहशतवाद्यांनी काही प्रश्न विचारले.. शहीद औरंगजेब यांनीही धाडसानं सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांची निर्घुण हत्या केली.. 


मारेकऱ्यांना ७२ तासांत संपवा 


शहीद रायफलमॅनच्या हत्येनंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. निवृत्त लष्करी अधिकारी असलेल्या औरंगजेबच्या वडिलांनी मुलाच्या हौतात्म्यानंतर मोदी सरकारला अल्टिमेटम दिलाय. औरंगजेबच्या मारेकऱ्यांना ७२ तासांत संपवा अन्यथा आपण स्वतः या हत्येचा बदला घेऊ असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय.