यांचे फ्लॉप जुगाड पाहून तुम्ही देखील म्हणाल `अक्ल नाम का चीज है कि नहीं?`
आपण सोशल मीडियाचा वापर मित्रांशी गप्पा मारणे, व्हिडीओ किंवा फोटो पाहाणे, माहिती मिळवणे यासाठी करतो.
मुंबई : आपल्यापैकी जवळ -जवळ प्रत्यक जण सोशल मीडियावर सक्रिय आहे. आपण सोशल मीडियाचा वापर मित्रांशी गप्पा मारणे, व्हिडीओ किंवा फोटो पाहाणे, माहिती मिळवणे यासाठी करतो. थोडक्यात काय तर सोशल मीडियामुळे आपले मनोरंजन होते. सोशल मीडियावर आपल्या असे काही व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात ज्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटते, आणि आपण असे व्हिडीओ आपल्या मित्राला देखील शेअर करतो आणि त्याची मजा घेतो.
सोशल मीडियावर आपल्याला अशी काही लोकं देखील सापडतात जे त्यांचे फॉलोअर्स आणि Views वाढवण्यासाठी कोणत्याही थराला जाता, मग ते यासाठी आपल्या जिवाची देखील पर्वा करत नाहीत.
तसेच सोशल मीडियावर आपल्याला अनेक जुगाडाचे व्हिडीओ देखील पाहायला मिळताता. आपल्यापैकी अनेक लोकांना हे असे जुगाड पाहायला खूप आवडतात. कारण काही लोकं खरोखर असा काही जुगाड लावताता की, आपण याची स्वप्नात देखील कल्पना करु शकत नाही. ज्यामुळे आपल्याला अशा लोकांच्या युक्तीचं कौतुक वाटतं.
परंतु काही जुगाड असे देखील असतात जे फ्लॉप असतात, म्हणजे त्यांच्या या जुगाडामधून काहीही साध्य होणारं नसतं, तर काही जुगाड हे जिव घेणे देखील असतात. काही लोकं कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आपलं नसलेलं डोक लावतात आणि आपला जिव धोक्यात घालतात.
असेच काही फ्लॉप जुगाडाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून तुम्हाला वाटलं की, यांना ही दुरबुद्धी कशी सुचली असावी? पण काहीही असो या मुर्ख लोकांना पाहून सोशल मीडिया यूजर्स खूप मजा घेत आहेत.
आम्ही देखील तुमच्यासाठी असे काहीसे फोटो आणले आहेत, जे पाहून तुमचे मनोरंजन होईल.
तुम्ही हे फोटोपाहून हुशार व्हा आणि अशा चूक करुन स्वत:चं नुकसान होण्यापासून लांब राहा.