Viral Video: बालवाडीतील पहिला दिवस अनेकांना आठवत असेल. पहिल्या दिवशी वर्गात अनेक पोरं रडताना दिसतात. प्रत्येकाच्या लक्षात राहिल असा तो दिवस असतो. सोशल मीडियावर (Social Media Viral Video) अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ  मनोरंजक असतात. असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे. (funny video of nursery student and school teacher goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल (Funny Video) होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडीओमध्ये एक नुकताच शाळेत गेलेला मुलगा शाळेच्या पहिल्या दिवशी रडताना दिसत आहे. त्याचबरोबर तो शाळेतील बाईंना (शिक्षिकेला) धमकी देताना दिसत आहे.


'माझे पप्पा पोलीसमध्ये आहेत. तुम्हाला गोळी मारतील', अशी धमकी हुंदके देत देत पोराने शिक्षिकेला दिली. मुलाचं बोलणं मजेशीर वाटल्याने शिक्षिकेने त्याला विचारलं. मला गोळी मारणार का?, त्यावर देखील डोळ्यात पाणी आलेला मुलगा 'हा तुम्हालाच...', असं उत्तर देतो.


दरम्यान, शाळेचा पिवळा गणवेश घातलेला चिमुकल्याचा भोळेपणा सर्वांनाच आवडला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. तर 60 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ आवडला आहे. आमचे शाळेतील दिवस आठवले, असं काहींनी कमेंट करत म्हटलं आहे.


पाहा व्हिडीओ-