Funny Wedding Card:  लग्नात पाहूणे मंडळींची एकवेळ गैरसोय झाली तरी चालेल परंतु लग्नपत्रिकेत 'ध' चा 'मा' झाला तर पाहूणे मंडळी 'लग्नाला जावं?' का इथपर्यंत विचार करतात. सध्या अशीच एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल (Viral Wedding Card) होताना दिसते आहे. यामध्ये लग्नाळू मंडळींनी पाहूण्यांना बोलवण्यासाठी चारोळी रचली खरी परंतु त्यात नेमका अर्थाचा अनर्थ झाला. हे वाचून नेटकऱ्यांनी या व्हायरल पोस्टची तूफान खिल्ली उडवली आहे सोबत काय करावे या विचारानं पाहूणे मंडळीच टेंशनमध्ये आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नासोबतच आपल्यासाठी लग्नपत्रिका हे कायमच विशेष आकर्षण राहिले आहे त्यातून अशा अनेक गमतीदार लग्नपत्रिका या (Wedding card on social media) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर सगळीकडे एकच धुमाकूळ उडतो. 


व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये लग्नाला आमंत्रण दिलेल्या मंडळींना नक्की म्हणायचे काय आहे? हेच वाचणाऱ्याला समजेनासे झाले आहे. आपल्याला लग्नपत्रिकेच्या माध्यमातून 'लग्न या' असे आमंत्रण देण्याचे प्रथा आत्तापर्यंत माहिती आहे. परंतु हे वेडिंग कार्ड वाचल्यानंतर ही मंडळी तर चक्क 'लग्नाला येऊ नका' असं म्हणतायत? त्यामुळे पाहूण्यांचा स्वाभाविकच गोंधळ उडाला परंतु त्याहीपेक्षा जास्त हास्याचा (Funny Wedding Card) फवारा उडाला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 


पाहूणे मंडळी टेंशनमध्ये 


आता हे एक वेडिंग कार्ड खरं आहे की खोटं आहे याचा थांगपत्ता करणं कठीण आहे किंवा यामध्ये कोणी काय फोटोशॉप केलं आहे का, याचाही काही पत्ता नाही. परंतु यातील लिहिलेल्या चारोळी वाचून तुम्हालाही तुमचं हसू आवरता येणार नाही. @jokeshijokesreal या फेसबुक पेजवरून ही पोस्ट व्हायरल झाली आहे. एका युझरनं याचा स्क्रिनशॉट (Mistake in Wedding Card) काढल्याचे दिसते आहे आणि खाली कॅप्शनमध्ये 'कळत नाहीये, लग्नाला येऊ की नको येऊ' असं गमतीनं म्हटलं आहे. 


मुळात आपल्या आप्तांना आणि मित्रजनांना लग्नाला आमंत्रण देण्यासाठी चारोळी लिहून त्यांना हक्कानं आणि प्रेमानं लग्नाला निमंत्रित करणं असा हेतू असतो परंतु अनेक जणं उत्साहाच्या भरात नाही नाही ते लिहून बसतात, अशीही अनेक उदाहरणं व्हायरल झाली आहेत त्यामुळे अर्थाचा अनर्थ व्हायलाही फारसा वेळ लागत नाही. 


हेही वाचा - Hair Care Tips: महिलांनी उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?


हास्याचा उडेल फावारा  


या व्हायरल होणाऱ्या पत्रिकेत मंडळींनी हिंदीत लिहिलं आहे की, 'भेज रहा हूं स्नेह निमंत्रण, प्रियवर तुम्हें बुलाने को, हे मानस के राजहंस, तुम भूल जाना आने को' या वाक्यामुळे एकच हशा पिकाला. याचा अर्थ असा की, 'आम्ही तुम्हाला स्नेह निमंत्रण पाठवत आहोत आमचा असा मानस आहे की विसरून तुम्ही आमच्या लग्नाला येयला'. यामध्ये आपलं पाहिलंत तर कदाचित 'तुम भूल न जाना आने को' असं लिहियच्या ऐवजी 'तुम भूल जाना आने को' अशी 'गलती से मिस्टेल' झाली असावी परंतु यामागील खरं काय हे समोर आलं नाही. त्यामुळे याची शाश्वती नाही. 



ही पोस्ट सध्या सगळीकडेच व्हायरल होते आहे. 13 एप्रिलला ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यावर तऱ्हेतऱ्हेचे कमेंट्सही करण्यात आले आहेत.