G20 Summit 2023 in Delhi : जी-20 परिषदेच्या पहिल्यात दिवशी दिल्ली जाहीरनाम्याला मंजुरी मिळाली. जी 20 च्या इतिहासात दिल्ली जाहीरनाम्याला (Delhi Declaration) मंजुरी मिळवत भारतानं नवा इतिहास रचलाय. जाहीरनाम्याला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व देशांचे आभार मानले. याशिवाय सध्या जी 20 देशांच्या कार्यक्षेत्रात ज्या 4 डेव्हलपमेंट बँका आहेत. त्या चार बँका मजबूत करुन गरजू देशांना पुढील दहा वर्षांत 200 अब्ज डॉलर्सचं अर्थ सहाय्य देण्यावर सहमती झाली. अफ्रिकन युनियनला जी-20 परिषदेचे (G20 Summit 2023) सदस्यत्व देण्यात आलं. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 परिषदेला संबोधित केलं. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सबका साथ, सबका विकासाचा मंत्रही जगाला दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या G20 देशांच्या कार्यक्षेत्रात 4 डेव्हलपमेंट बँका आहेत. त्या चार बॅंका मजबूत करुन गरजू देशांना पुढील दहा वर्षांत 200 अब्ज डॉलर्सची अर्थ सहाय्य देण्यावर सहमती दर्शविण्यात आली आहे. तसेच हा काळ युद्धाचा नाही या भारताच्या युक्रेन रशिया युद्धाविषयीच्या भूमिकेचा पुनरुच्चार या डिक्लरेशनमध्ये करण्यात आला आहे. सर्व विकासात्मक आणि भू-राजकीय मुद्द्यांवर 100 टक्के सहमती झाल्याने विश्लेषकांनी या शिखर परिषदेला ऐतिहासिक मानलं आहे.



उद्याच्या म्हणजे भविष्यातील शहरांच्या उभारणीत पर्यावरण सामाजिक आणि आर्थिक समतोल साधण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. जगभरात वाढणाऱ्या शहरीकरणात निकषांच्या आधारे अर्थ सहाय्य करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. 37 पानी समझोत्यावर पहिल्याच दिवशी 100 टक्के एकमत झालंय. G20 च्या इतिहासात कधीही झालेलं नाही. त्यामुळे जे जगाला जमलं नाही ते भारताने करून दाखवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


आणखी वाचा - G20 Summit Dinner : परदेशी सामन्यासाठी राष्ट्रपतींची खास मेजवानी; 'या' चविष्ठ पदार्थांचा समावेश!


दरम्यान, जी 20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर असलेल्या नावाच्या पाटीवर देशाचं नाव भारत असं लिहीलंय. देशाच्या नावातला इंडिया हा उल्लेख वगळून भारत उल्लेख करण्याची सध्या चर्चा रंगली आहे. जी 20 संदर्भातल्या राष्ट्रपतींच्या आमंत्रणावरही इंडियाऐवजी भारत असाच उल्लेख होता. त्यात आता प्रत्यक्ष परिषदेतही पंतप्रधान मोदींच्या नावासमोरील पाटीवर भारत असं लिहीलंय.