अकोला - खंडवा रेल्वे अपग्रेडेशन संदर्भात गडकरी, गोयल यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक
....
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पियूष गोयल यांच्यात आज (मंगळवार, १९ जून) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. य़ा बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत अकोला - खंडवा रेल्वे अपग्रेडेशन काम सुरू करण्याबाबचा मुद्दा महत्त्वाचा होता अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, २५ आक्टोबर १९८० पूर्वीच्या प्रकल्पात एफसीए (वन विभाग) परवानगीची गरज नसल्याचे नितीन गडकरी यांच्या सोबत बैठकीत स्पष्ट झाले. या बैठकीमुळे प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होईल. त्याचा राजस्थान, हरियाणा, पंजाब , युपी, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांना फायदा होईल, अशी सूत्रांची माहिती आहे.