IPL 2025 Retention: '...म्हणून ₹14 कोटींपेक्षा कमी किंमतीत तो येणार नाही'; काव्या मारन टेन्शनमध्ये?

IPL 2025 Retention: इंडियन प्रिमिअर लीग 2025 च्या मेगा ऑक्शनआधी उद्योजिका काव्या मारन यांच्या मालकीच्या संघाच्या माजी प्रशिक्षकाने एक सूचक इशारा देताना एका 24 वर्षीय भारतीय खेळाडूचा उल्लेख केला आहे. या खेळाडूला संघात टीकवायचं असेल तर काव्य यांच्या संघाला मोठी रक्कम लिलावात मोजावी लागेल असा दावा या माजी प्रशिक्षकाने केला आहे. नेमकं कोणी आणि काय म्हटलंय जाणून घ्या... 

| Oct 02, 2024, 13:22 PM IST
1/13

abhisheksharmaipl2025

लिलावामध्ये सर्वाधिक रक्कम मिळण्याची शक्यता ज्या खेळाडूबद्दल व्यक्त केली जात आहे त्याच्याचसंदर्भात माजी प्रशिक्षकांनी इशारा दिला आहे. जाणून घेऊयात कोणी आणि काय म्हटलं आहे.

2/13

abhisheksharmaipl2025

सनरायझर्स हैदराबादचे माजी कर्णधार टॉम मुडी यांनी एका 24 वर्षीय भारतीय क्रिकेटपटूबद्दल मोठं भाकित केलं आहे. आर्थिक दृष्टीकोनातून या खेळाडूला नियंत्रणात ठेवणं आणि संघाबरोबर कायम ठेवणं काव्य मारन यांच्या संघाला कठीण जाईल असं टॉम मुडी यांचं म्हणणं आहे.

3/13

abhisheksharmaipl2025

आयपीएल 2024 मधील कामगिरीच्या जोरावर या खेळाडूला भारतीय संघात संधी मिळाली. त्याने याच वर्षी जुलै महिन्यात झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने आपल्या तिसऱ्याच अंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. 

4/13

abhisheksharmaipl2025

सनरायझर्सच्या मालकीण काव्या मारन यांनीही लिलावादरम्यान थेट या खेळाडूचा उल्लेख करत असे खेळाडू निर्माण करण्यासाठी बराच वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो असं म्हटलं होतं. मात्र आता याच खेळाडूला संघात कायम ठेवणं काव्या यांच्यासाठी मोठा गुंतागुंतीचं प्रकरण ठरणार आहे असं टॉम मुडी यांना वाटतंय.  

5/13

abhisheksharmaipl2025

खरं तर हा खेळाडू सुरुवातीला दिल्लीच्या संघातून खेळायचा. त्यानंतर तो सनरायझर्सकडून खेळू लागला. त्याच्यासाठी 2022 चं आयपीएलचं पर्व महत्त्वाचं ठरलं. त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली. त्याने या पर्वात 426 धावा 133.13 च्या सरासरीने केल्या. 

6/13

abhisheksharmaipl2025

2024 च्या आयपीएलमध्ये त्याने सलामीवीर म्हणून दमदार कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हीस हेडबरोबर त्याची चांगली जोडी जमील. त्याने 204.22 च्या सरासरीने या पर्वात 484 धावा कुटल्या. 

7/13

abhisheksharmaipl2025

टॉम मुडी ज्या खेळाडूबद्दल बोलत आहेत त्याचं नाव आहे अभिषेक शर्मा! या डावखुऱ्या फलंदाजाने 2024 च्या पर्वात सलामीवीर म्हणून तुफान फटकेबाजी करत संघाला अनेक रोमहर्षक विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावला होती. 

8/13

abhisheksharmaipl2025

आता 2025 च्या आयपीएलसाठी रिटेन्शनच्या दृष्टीकोनातून सनरायझर्स हैदराबादला अनेक परदेशी खेळाडूंना प्राधान्य द्यावं लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात अभिषेक काही कमी पैशांमध्ये संघासोबत थांबेल असं मूडी यांनी वाटत नाही. त्यामुळेच आता संघ मालकीण काव्य मारन आणि त्यांच्या व्यवस्थापकीय टीमची डोकेदुखी वाढणार आहे.  

9/13

abhisheksharmaipl2025

नव्या रिटेन्शन नियमांनुसार कोणत्याही एका खेळाडूला जास्तीत जास्त 18 कोटी देऊन रिटेन करता येईल. तर अन्य दोन खेळाडूंना प्रत्येकी 14 कोटी देऊन संघात कायम ठेवता येणार आहे. तसेच चौथ्या खेळाडूला रिटेन करण्यासाठी 11 कोटी देण्याची मूभा आहे. बरं हा सारा पैकी खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या 120 कोटींमधूनच खर्च करावा लागणार आहे.  

10/13

abhisheksharmaipl2025

सनरायझर्स हैदराबादकडे सध्या कर्णधार पॅट कमिन्स, ट्रॅव्हीस हेड, हेन्रीक कार्ल्सन यासारखे दमदार खेळाडू आहेत. या संघाकडे अनेक परदेशी खेळाडू रिटेन्शनसाठी पर्याय म्हणून उपलब्ध असून रिटेन्शनच्या नियमांमध्ये परदेशी खेळाडूंच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे हा संघ वरील तिघांनाच कायम ठेऊ शकतो अशी एक शक्यता आहे.  

11/13

abhisheksharmaipl2025

टॉम मूडी यांनी अभिषेक शर्मा त्याची कामगिरी पाहता नक्कीच या 14 कोटींच्या स्लॉटपैकी एकावर आपल्याला रिटेन केलं जावं अशी मागणी करु शकतो असं मत व्यक्त केलं आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे अभिषेक लिलावात उतरला तर नक्कीच त्याला 14 कोटी किंवा अधिक रक्कम मिळू शकते असं मूडी यांना वाटतं. 

12/13

abhisheksharmaipl2025

"माझ्यामते सनरायझर्ससमोर कोणाला रिटेन करायचं हा सर्वात मोठा आणि कठीण प्रश्न असणार आहे. मला नाही वाटत की अभिषेक शर्मा 14 कोटींपेक्षा कमी किंमतीमध्ये संघाबरोबर कायम राहण्यास इच्छूक असेल. यामागील कारण म्हणजे इतर कोणताही संघ त्याला 14 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम देऊन सहज संघात घेईल," असं मूडी यांनी 'ईएसपीएन'शी बोलताना म्हटलं आहे.   

13/13

abhisheksharmaipl2025

"त्यामुळेच सनरायझर्सच्या संघाला कमिन्स आणि हेड्स यासारख्या त्यांच्या प्रभावशाली खेळाडूंचा विचार करत यामधून मार्ग काढावा लागणार आहे. माझ्यामध्ये या दोघांबरोबर संघ अभिषेकला रिटेन करेल," असं मूडी म्हणाले.