नवी दिल्ली : गुरूग्रामच्या मानेसरमध्ये गर्भवती महिलेचा गॅंगरेप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. महिलेने घरी जाण्यासाठी शेयरिंग ऑटो रिक्षा केली. पण एकटी महिला पाहून ऑटो चालकाने आपल्या दोन मित्रांच्या साथीने तिच्यावर बलात्कार केला. २१ मेला ६ महिन्यांची गर्भवती महिला रुटीन चेकअपसाठी आपल्या पतीसोबत सायकलने स्थानिक हॉस्पीटलला जात होती. हॉस्पीटलमधून घरी परतत असताना तिला सायकलवर बसण्यास त्रास होत होता. त्यावेळी पतिने तिला ऑटो रिक्षाने घरी जाण्यास सांगितलं.त्यावेळी तिथे एक शेयरिंग ऑटो येऊन थांबली. यामध्ये आधीच दोन व्यक्ती बसल्या होत्या. रिक्षात आल्यावर ड्रायव्हरने तिला पाणी प्यायला दिले. त्यानंतर ती बेशुद्ध पडली आणि तिघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला.


तपास सुरू 


 पीडिता ही बिहारमध्ये आपल्या पतीसोबत राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांना एक मुलगाही आहे. घटनेच्या ४ दिवसांनंतर पिडितेने याबद्दल तक्रार दाखल केली. मेडिकल टेस्ट केल्यानंतर अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.