घरगुती गॅसच्या किंमतीत तब्बल ९३ रुपयांनी वाढ!
तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमती तब्बल ९३ रूपयांनी वाढवल्यात. विना अनुदानित सिलेंडरवर ही वाढीव किंमत लागू होणार आहे.
नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमती तब्बल ९३ रूपयांनी वाढवल्यात. विना अनुदानित सिलेंडरवर ही वाढीव किंमत लागू होणार आहे.
१ नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू करण्यात आलीय. याशिवाय अनुदानीत सिलेंडरच्या किंमतीतही ४ रूपये ५६ पैशांनी वाढवण्यात आलीय.
तब्बल ९३ रूपयांची वाढ झाल्यामुळे विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये नागरिकांना ७४२ रूपये, कोलकातामध्ये ७५९ रूपये, चेन्नईत ७५० रूपये तर मुंबईत ७१८ रूपये मोजावे लागणार आहेत... तर १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १ हजार २६८ रूपये झाली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून गॅस सिलेंडरच्या किंमतीत चार रूपयांची वाढ होत होती मात्र आता अचानक किंमती भरमसाठ वाढवण्यात आल्या. वाढलेल्या किंमतीमुळे अनुदानित सिलेंडरसाठी नागरिकांनी मुंबईत ४९८ रूपये मोजावे लागतील.