GATE 2023 Result AnnounceToday: इंडियन इस्टिट्यूट टेक्नोलॉजी कानपूरतर्फे (IIT Kanpur) आज गेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ग्रेज्यूएट एप्टीट्यूड टेस्टची (GATE) इन इंजिनियरिंग परीक्षेचा निकाल तुम्ही gate.iit.ac.in या वेबसाईटवर पाहू शकता. तेव्हा लगेगच जाणून घ्या की तुम्ही तुमच्या परीक्षेचा निकाल कुठे, कधी आणि कसा (How To see Gate Exam Result) पाहू शकता. गेल्या अनेक दिवसांपासून या परीक्षेच्या निकालाबद्दल आयआयटी कानपूरकडून अपडेट देण्यात येत होते शेवटी आता विद्यार्थ्यांची वाट संपली असून आज गेट परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. गेट परीक्षेची परीक्षा ही मागच्या महिन्यात फेब्रुवारीत घेण्यात आली होती. आता आज तुम्ही त्याचा रिझल्ट पाहू शकता. तेव्हा चला तर विद्यार्थ्यांनो जाणून घेऊया की, तुम्ही कसा पाहू शकता तुम्ही तुमचा निकाल? (GATE 2023 Result Today Know How To Check Result At Gate.iitk.ac.in)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निकाल पाहून झाल्यावर आपल्याला आपला स्कोअरकार्डही डाऊनलोड करून घ्यायचा असतो. तेव्हा तुम्ही गेट या परीक्षेचा स्कोअरकार्ड तुम्ही 21 मार्चनंतर डाऊनलोड करून घेऊ शकता. हा निकाल दोन टप्प्यांमध्ये जारी केला जाईल. एक फेरी ही सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजता दाखवला जाईल तर दुसरा निकाल हा दुसऱ्या फेरी म्हणजे दुपारी 1.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत जाहीर केला जाईल. 


  • gate.iitk.ac.in या वेबसाईटवर जा. 

  • GOAPS या पोर्टल लिंकवर क्लिक करा. 

  • त्यानंतर तुम्हाला त्यात तुमचा ईमेल आयडी आणि, तुमचा आयडी नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. 

  • हे सर्व डिटेल्स भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. 

  • त्यानंतर तुमच्या स्क्रिनवर तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.


गेट परीक्षेच्या निकालानंतर आपल्याला कुठल्या क्षेत्रात जाता येईल याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या विषयांद्वारे कुठे किती कट-ऑफ (Cut Off) होता याची पुर्ण माहिती असेल तर त्यानुसार तुम्ही पुढील तयारी करू शकता. त्यातूनही तुम्ही काऊन्सलिंग घेऊ शकता. तुमचा स्कोअरकार्ड तुम्ही 21 मार्चनंतर डाऊनलोड (How to Download Score Card) करू शकता. या परीक्षेसाठी 6 लाखाहून अधिक विद्यार्थी बसेल होते. त्यातून काही विद्यार्थी हे उत्तीर्ण होतील तर काही अनुत्तीर्ण. परंतु येत्या काही दिवसांतच उत्तीर्ण विद्यार्थी हे अप्लाय करू शकता. तेव्हा विद्यार्थी येत्या काही अपडेट्सवर भर देऊ शकता. जे येत्या काही दिवसांतच जाहीर होतील.