COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरू: पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती पुडे येत आहे. आणखी १० लोक मारेकऱ्यांच्या हिटलीस्टवर असल्याचं समोर येतंय. माजी मंत्री एम. बी. पाटील आणि विनय कुलकर्णी यांची नावं मारेकऱ्य़ांची नावं यादीत असल्याचं समोर येतंय. लिंगायतांना स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी यासाठी या दोन मंत्र्यांनी मोठी धडपड केली होती. म्हणून हिंदू धर्मात फूट पाडायचा प्रयत्न केला म्हणून राग ठेऊन या दोघांनाही मारण्याचा कट असल्याचं वाघमारेच्या चौकशीतून पुढे आलंय.


महाराष्ट्र एसआयटी पथक घेणार परशूराम वाघमारेचा ताबा


गौरी लंकेश हत्या प्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी परशूराम वाघमारे याला ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्र एसआयटीचं पथक बंगळुरूला रवाना होत आहे. मात्र, कर्नाटक एसआयटी या प्रकरणाचा कसून तपास करत असल्याने वाघमारेचा ताबा महाराष्ट्र एसआयटीला मिळेल का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे, एमएम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासात परशुराम वाघमारे आणि इतरांच्या अटकेमुळे महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस आलं आहे.


चौघांच्याही हत्येचं मूळ एकच


महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्यप्रदेश या चारही राज्यात या हत्येची पाळेमुळं असल्याची चर्चा आहे. शिवाय लंकेश, पानसरे, कलबुर्गी आणि दाभोलकर यांच्या हत्येचं मूळ एकच असल्याचं समोर येतंय. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानुसार पानसरे आणि कलबुर्गीच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तुलच लंकेश यांची करण्यासाठी वापरण्यात आली. यापूर्वी गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणात प्रमुख संशयीत आरोपी समीर गायकवाड यांच्या चौकशीसाठी कर्नाटक एस.आय.टी कोल्हापूरला आली होती.