अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार संस्था हिंडेनबर्गचा (Hindenburg) अहवाल जाहीर झाल्यानंतर उद्योगपती आणि अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. अदानी ग्रुपने हिंडेनबर्गचा अहवाल मात्र निराधार असल्याचं सांगत सर्व आरोप फेटाळले आहेत. अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाचे (Adani Group Shares) शेअर्स घसरत आहेत. इतकंच नाही अदानी एंटरप्रायझेची (Adani Enterprises) 20 हजार कोटींच्या ‘फॉलो-ऑन समभाग विक्री’ (Follow On Public Offer) अर्थात ‘एफपीओ’ (FPO) प्रक्रिया रद्द केली आहे. खुद्द गौतम अदानी (Gautam Adani) यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करत गुंतवणुकदारांना यामागील कारण सांगितलं. दरम्यान गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली असून श्रीमंतांच्या यादीत फार खाली गेले आहेत. पण संपत्तीत घट झालेल्या उद्योजकांच्या यादीत फक्त एकटे गौतम अदानी नसून मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) यांचाही समावेश आहे. 


तीन अब्जाधीशांचं नुकसान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी सर्वाधिक आर्थिक नुकसान झालेल्यांमध्ये गौतम अदानी, मुकेश अंबानी आणि राधाकिशन दमानी यांचा समावेश आहे. दरम्यान अंबानी आणि दमानींच्या तुलनेत अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी जवळपास 59 बिलिअन डॉलर्ससह ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्समध्ये 21 व्या स्थानी आहेत. अदानींनी आतापर्यंत आपली 62 बिलियन डॉलर्स संपत्ती गमावली आहे.


अंबानी आणि दमानी यांच्या सपंत्तीत किती घट झाली?


मुकेस अंबानी यांच्याकडे सध्या 80 बिलिअन डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती आहे. पण त्यांना यावर्षी 6.3 बिलिअन डॉलर्सचं नुकसान झालं आहे. यानंतर वेन्यू सुपरमार्ट्सचे (DMart) संस्थापक राधाकिशन दमानी यांचा क्रमांक आहे. त्यांची एकूण संपत्ती 16.7 बिलिअन डॉलर इतकी आहे. त्यांच्या संपत्तीत 2.61 बिलिअन डॉलर्सची घसरण झाली आहे. 


अदानींचे शेअर्स 50 टक्के घसरण


हिंडेनबर्गच्या अहवालामुळे, अदानी समूहातील कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांनी एकूण 9 लाख कोटींचं मार्केटिंग कॅप गमावलं आहे. Adani Total Gas चे शेअर्स यादरम्यान 51 टक्क्यांना घसरुन 3,885.45 वरुन 1901.65 रुपयांवर पोहोचले आहेत. अदानी ग्रीन एनर्जी (40 टक्के), अदानी एंटरप्रायजेस (38 टक्के), अदानी ट्रान्समिशन (37 टक्के), अदानी पोर्ट्स आणि एसईझेड (35 टक्के), अंबुजा सिमेंट्स (33 टक्के), अदानी विल्मर (23 टक्के), अदानी पावर (22.5 टक्के), एसीसी (21 टक्के) आणि एनडीटीव्ही (17 टक्के) यांच्या मोठी घसरण झाली आहे. 


FPO मागे घेण्याचा निर्णय


Adani Enterprises FPO Calls Offs : अदानी समूहाने (Adani Group) आपली फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायझेची (Adani Enterprises) 20 हजार कोटींच्या ‘फॉलो-ऑन समभाग विक्री’ (Follow On Public Offer) अर्थात ‘एफपीओ’ (FPO) प्रक्रिया रद्द केली आहे. अदानी समूहाने गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जाणार असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. 


गौतम अदानी (Gautam Adani) यांनी स्वत: पुढे येऊन या गुंतवणूकदारांशी संवाद साधला आणि ‘एफपीओ’ प्रक्रिया रद्द करण्यामागील कारण सांगितलं आहे. गौतम अदानी यांनी सांगितलं आहे की, शेअर बाजारात होणारी हालचाल आणि चढ-उतार पाहता आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करणं कंपनीचा हेतू आहे. यामुळे आम्ही FPO मधून मिळालेले पैसे परत करत अशून यासंबंधीचा व्यवहार बंद करत आहोत. 


"माझ्यासाठी गुंतवणूकदारांचं हित प्राथमिकता आहे. यासाठी गुंतवणूकदारांना संभाव्य नुकसानापासून वाचवण्यासाठी आम्ही FPO प्रक्रिया मागे घेतली आहे. या निर्णयाचा आमचा सध्याचा कारभार आणि भविष्यातील योजनांवर काही फरक पडणार नाही," असंही त्यांनी सांगितलं. 


"एक उद्योजक म्हणून गेल्या चार दशकांच्या माझ्या प्रवासात माझे हितचिंतक आणि गुंतवणूकदारांच्या समूहाने मोठं समर्थन दिलं. मी आयुष्यात जे काही थोडं, जास्त मिळवलं आहे ते त्यांच्या विश्वासाच्या आधारेच आहे. मी माझ्या यशाचं सर्व श्रेय त्यांना देतो," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.