मुंबई : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी (Gautam Adani) तिसऱ्या स्थानी आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी पहाटेत ते  दुसऱ्या स्थानी होते. मात्र संध्याकाळी अदानींच्या संपत्तीत $2.2 अब्जची घट झाल्याने ते तिसऱ्य़ा स्थानावर फेकले गेले होते. दरम्यान श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील क्रमवारीत मोठी सुधारणा झाल्यानंतर अदानींनी मोठा निर्णय घेतला होता. अदानी यांनी आता अदानी समुहाचं (Adani) नेतृत्व नवीन पिढीकडे सोपवलं आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने अदानींनी मुकेश अंबानीच्या पावलावर पाऊल टाकत हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम अदानी (Gautam Adani) आपल्या व्यवसायाचा विस्तार वाढवत चालले आहेत. अलीकडे गौतम अदानी यांनीही सिमेंट व्यवसायात प्रवेश केला आहे.अदानी समूहाने अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी लि.चे अधिग्रहण पूर्ण केले आहे. यासह हा समूह देशातील दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक बनला आहे. त्यामुळे अदानी समूहाचा व्यवसाय बंदरे आणि उर्जेपासून ते विमानतळ आणि दूरसंचारापर्यंत पसरला होता आणि आता त्यात सिमेंटचीही भर पडली आहे.


Gautam Adani बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती, आकडा पाहून धक्का बसेल 


अधिग्रहणाची मोठी घोषणा 
अदानी (Adani) समूहाने 6.5 अब्ज डॉलर्समध्ये अंबुजा सिमेंट्स आणि ACC चे अधिग्रहण करण्याची घोषणा केली. अंबुजा आणि ACC मधील होल्सीमच्या स्टेकचे अधिग्रहण तसेच भागधारकांना खुली ऑफरचा या करारात समावेश आहे.अदानी मार्फत अधिग्रहण केल्यानंतर लगेचच, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि मुख्य वित्तीय अधिकारी (CFOs) यांच्यासह दोन्ही सिमेंट कंपन्यांच्या संचालक मंडळाने त्यांचे राजीनामे जाहीर केले. समूहाने आपले संस्थापक अध्यक्ष गौतम अदानी यांना अंबुजा सिमेंटचे प्रमुख म्हणून नाव दिले आहे.


करण अदानीवर मोठी जबाबदारी
गौतम अदानी (Gautam Adani) यांचा मुलगा करण सिमेंट व्यवसायाची जबाबदारी सांभाळणार आहे. सध्या ते समूहाचा बंदर व्यवसाय पाहत आहेत. आता दोन्ही कंपन्यांमध्ये संचालक म्हणून आणि एसीसी लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अदानी समूहाने दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये अंबुजा सिमेंट्सच्या बोर्डावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) माजी अध्यक्ष रजनीश कुमार आणि ACC बोर्डावर शेल इंडियाचे माजी अध्यक्ष नितीन शुक्ला यांचा समावेश आहे. समूहाने नीरज अखौरी यांच्या जागी अजय कुमार यांची अंबुजा सिमेंटचे सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे.श्रीधर बालकृष्णन हे ACC चे CEO असतील. ते सध्या अदानी पोर्ट्स आणि सेझ लिमिटेडची जबाबदारी सांभाळत आहेत.


गौतम अदानी यांना 24 तासात मोठा झटका; गमावलं श्रीमंताच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकाचं स्थान


जीत अदानीवरही जबाबदारी


गौतम अदानी (Gautam Adani) यांचा धाकटा मुलगा जीत याने स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेस, युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया येथून बॅचलरची पदवी घेतली आहे. ते समूहातील वित्त व्यवहाराचे उपाध्यक्ष आहेत. 


दरम्यान आता मुकेश अंबानीप्रमाणे गौतम अदानी (Gautam Adani) यांनी अदानी समुहाचं नेतृत्व नव्या पिढीकडे सोपवले आहे. त्यामुळे अदानी यांच्या या निर्णयाची उद्योग विश्वात चर्चा आहे.