Gautam Adani Wife : असं म्हणतात, की प्रत्येत यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. खरंच आहे ते. कारण, स्त्रीमुळं मिळणारा आधार हा शब्दांत मांडता येत नाही. सहनशीलता, संयम आणि थोडक्यात आनंद मानण्याचं कसब महिलांना उपजतच असतं, ही बाब कोणीही नाकारू शकत नाही. अशाच एका महिलेनं सध्या सर्वांच्या मनाचा ठाव घेतला आहे. ही महिला कुणी साधीसुधी स्त्री नाही, तर ती अब्जधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांची पत्नी आहे. (Gautam Adanis wife priti adanis simplicity wins hearts)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(Priti Adani) प्रिती अदानी असं त्यांचं नाव. प्रिती अदानी या प्रशिक्षित दंत चिकित्सक आहेत. सध्याच्या घडीला त्या Adani Group`s Corporate Social Responsibility (CSR) Initiatives चं नेतृत्त्वं करतात. 


सर्वसामान्यांच्या आयुष्याच्या पुढच्या आणि आणखी प्रगत स्तरावर कसं पोहोचवता येईल यासाठी प्रिती अदानी त्यांच्या या संस्थेतून प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं. प्रिती अदानी या त्यांच्या चाणाक्ष बुद्धिसोबतच त्यांच्या साध्या राहणीमानासाठीसुद्धा ओळखल्या जातात. 


वाचा : Ambani Family : मुलंच नाही, अंबानी कुटुंबाच्या सूनाही आहेत उच्चशिक्षित; एकीची पदवी वाचून हैराण व्हाल!


 


श्रीमंती आहे, म्हणून वारेमाप खर्च करण्याकडे प्रिती अदानी यांचा कधीच कल दिसत नाही. त्यांच्या वेशभूषेच्या अंदाजातही तोच साधेपणा दिसून येतो. पेस्टल शेड्स असणाऱ्या साड्या, कमीत कमी दागिने अशाच रुपात त्या कायम विविध कार्यक्रमांना दिसतात. 


मोत्याच्या दागिन्यांना विशेष पसंती 


हिरेमाणकं आणि सोन्याच्या दागिन्यांपेक्षा प्रिती अदानी कायमच मोत्याच्या दागिन्यांना पसंती देताना दिसतात. सध्या त्या अदानी फाऊंडेशनच्या संचालकपदी आहेत. 


प्रिती आणि गौतम अदानी यांची Love Story 


'Gautam Adani: Reimagining Business in India'  या पुस्तकातून गौतम अदानी आणि प्रिती अदानी यांच्या Love Story वर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रिती यांचे वडील, सेवंतीलाल यांनी अदानींना आपल्या लेकिसाठी पसंत केलं होतं. त्यावेळी ते पदवीधरही नव्हते. तर, प्रिती वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत होत्या. त्यामुळं गौतम अदानी हे स्थळ आपल्यासाठी योग्य नसल्याचं म्हणत त्यांनी नकार दिला. 


वडिलांच्या मनात मात्र हाच मुलगा बसला होता. व्यक्तीची पात्रता बघ, जर एखाद्या व्यक्तीमध्ये पात्रता असेल, तर त्याला स्वत:च्या पायावर उभं राहायला वेळ लागणार नाही असं म्हणत त्यांनी लेकिची मनधरणी केली. शेवटी सेवंतीलाल यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि गौतम- प्रिती यांची पहिली भेट झाली. त्यांनी एकमेकांशी संवाद साधला आणि लागलीच या नात्यासाठी होकारही दिला.