नवी दिल्ली :पुण्यातील गौतम बाम्बावले यांची भारताचे चीनमधील अम्बसिडर (दूतावास) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.गौतम बाम्बावले हे १९८४ च्या फॉरेन सर्विस बॅचचे अधिकारी आहेत.  १९८५ ते १९९१ दरम्यान ते बीजिंगमध्ये भारतीय दूतावासचे उपप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी विजय गोखले चीनचे ॲम्बसेडर होते. त्यांची जागा गौतम बाम्बावले घेतील. त्यांनी भूतानचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे. ते जपान, चीन, मंगोलिया, उत्तर कोरियाच्या डेस्कचे प्रमुख होते. त्यांनी जर्मनी, अमेरिकेतही त्यांनी काम केले आहे.



या सगळ्या देशांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. सध्या ते पाकिस्तानात उच्चायुक्त म्हणून काम करत आहेत. पारिस्तानात भारताची बाजू मजबूतपणे मांडण्याचे काम त्यांनी केलेय. चीन विषयी त्यांचा सखोल अभ्यास आहे. डोकलाम मुद्द्यामुळे चीन भारतात आलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.