नवी दिल्ली : भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न, अर्थात जीडीपी (आर्थिक विकास दर) काढण्याच्या प्रक्रियेमध्ये त्रुटी असून २०११-१२ आणि २०१६-१७ या दोन आर्थिक वर्षांमध्ये जी़डीपी वाढीव सांगितला गेल्याचा दावा देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी केला आहे. केंद्र सरकारने तातडीने हा दावा फेटाळला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्वर्ड विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटनं एक लेख प्रसिद्ध झाला. या लेखात अनेक चुकीच्या मानांकनांवर जीडीपी मोजला गेल्याचं सुब्रमण्यम् यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्या दोन आर्थिक वर्षांमध्ये जीडीपी साडेचार टक्क्यांच्या आसपास असण्याचा त्यांचा अंदाज आहे.


२०११-२०१२ आणि २०१६-१७ दरम्यान भारताचे जीडीपी वाढीचे प्रमाण २.५ टक्क्यांवरून वाढविण्यात आले असल्याचे अरविंद सुब्रमण्यम यांनी आपल्या ताज्या संशोधन अहवालात नमूद केले आहे. ते म्हणाले की, २०११ आणि २०१६ च्या आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये ६.९ टक्के वाढीचा दावा केला गेला होता परंतु त्या काळात विकास दर ३.५ ते ५.५ टक्के होता.


आर्थिक सल्लागार परिषदेने जारी केलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, सुब्रमण्यम यांनी पेपरमध्ये केलेल्या अंदाजांचे तपशील आणि तपशीलवाराचे खंडन करण्यात आले आहे. मात्र, जाहीर आकडेवारीनुसार तो ७ टक्के असल्याने या दोन वर्षांत भारत ही जगातली सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ठरली आहे.