Trending Quiz : दररोज घड्याळ पाहाता, पण तुम्हाला माहित आहे का AM आणि PM चा फूल फॉर्म?
Trending Quiz : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी त्यांचं सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी प्रश्नमंजुषा हे एक चांगलं माध्यम आहे. आजकाल, प्रश्नमंजुषा प्रश्नांनी इंटरनेटवर खळबळ माजवली आहे.
General Knowledge Trending Quiz : तुम्हाला तुमचं सामान्य ज्ञान वाढवायचं असेल, तर कोड्यांची उत्तर देणं हे तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीसाठी मुलाखत देताना सामन्य ज्ञानाचा उपयोग होतो. यासाठी वाचन आणि कोडी सोडवणं यावर भर देणं गरजेचं आहे. यादृष्टीनेच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरेही आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात.
प्रश्न - कोणता प्राणी भूक लागल्यावर आपलंच शरीर खाऊ शकतात?
उत्तर - भूक लागल्यावर उंदीर आपलं शरीर खाऊ शकतात.
प्रश्न - अजंठा लेणी कोणत्या राज्यात आहेत?
उत्तर - अंजठा लेणी महाराष्ट्र राज्यात आहे.
प्रश्न - भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त पाऊस होतो?
उत्तर - भारतात मेघालय राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद होते
प्रश्न - जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे?
उत्तर - जगातील सर्वात उंच इमारत दुबईतील बुर्ज खलीफा ही आहे.
प्रश्न - कोणता जीव असा आहे जो जीभेने नाहीत तर पायाने चव घेतो?
उत्तर - फुलपाखरू आपल्या जिभेने नव्हे तर पायाने चव चाखतं.
प्रश्न - तुम्हाला माहित आहे का AM आणि PM चा फूल फॉर्म?
उत्तर - ज्या वेळी घड्यांचा अविष्कार झाला नव्हता, त्यावेळी वेळेचा अंदाज घेण्यासाठी सूर्याची दिशा पाहिली जायची. रात्रीच्या वेळी चंद्र आणि ताऱ्यांच्या मदतीने वेळेचा अंदाज बांधला जातो. पण ज्यावेळी घड्याळ्याचा शोध लागला त्यावेळी वेळ सांगण्यासाटी एएम आण पीएमचा वापर सुरु करण्यात आला. पण बऱ्याच जणांना AM आणि PM चा अर्थ माहित नाही. हा प्रश्न रेल्वे, बँक आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांना हमखास विचारला जातो.
AM चा फूल फॉर्म Ante Meridiem असा होतो. याचा अर्थ दुपारच्या आधी. तर PM फूल फॉर्म Post Meridiem असा आहे. याचा अर्थ दुपारच्यानंतर. एएमचा उपयोग अर्ध्या रात्रीपासून सकाळी 11.59 पर्यंत केला जातो. तर पीएमचा वापर दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 11.59 वाजेपर्यंत केला जातो.