मुंबई : पेट्रोल डिझेलच्या किंमतींवर अनेक लोकांचे डोळे लागलेले असतात. याच्या किंमती कधी घसरतील, असे वाटत असताना वारंवार पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पेट्रोल महागले आहे. तर त्यावरुन रोजची पेट्रोल डिझेलची किंमत ठरत असते. पण आता चिंता करण्याची गरज नाही. आता पेट्रोलवर तुम्हाला कॅशबॅक मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त एक खास पद्धतीचा अवलंब करायचा आहे.


काय आहे ही कॅशबॅक ऑफर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोलच्या ऑनलाईन पेमेंटवर तुम्हाला सुट मिळेल. पण हेच पेमेंट तुम्ही मोबिक्विक वॉलेटमधून केले तर तुम्हाला मोठी कॅशबॅक मिळेल. कंपनीने सुरु केलेल्या या खास स्कीममध्ये संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत पेट्रोल भरल्यास तुम्हाला सुपरकॅश ऑफर मिळेल. यात 10% कॅशबॅकची ऑफर आहे.


कधीपर्यंत मिळेल ही ऑफर?


मोबिक्विकने ही ऑफर २८ मार्च २०१८ ला सुरु केली आहे. या ऑफरची व्हॅलिडीटी १ जून २०१८ पर्यंत आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी ५० रुपयांचे पेट्रोल भरावे लागेल. याचा फायदा तुम्ही आठवड्यातून दोनदा घेऊ शकता.


कसा मिळेल फायदा?


पेट्रोल पंपावर पेमेंट करताना फक्त क्यूआर (QR)कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर तुम्ही ज्या किंमतीचे पेट्रोल भरले आहे ती किंमत एंटर करा. कंपनीने यासाठी ५० रुपयांच्या कॅशबॅकचे कॅप लावले आहे. कॅशबॅक आल्यानंतर तुम्ही दुसऱ्या वेळेस पेट्रोल टाकू शकता. यासाठी तुम्हाला कमीत कमी २०० रुपयांचे पेट्रोल टाकावे लागेल.


कॅशबॅकशिवायही मिळेल सूट


पेट्रोल टाकल्यानंतर तुम्हाला वॉलेटमध्ये कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर 0.75% च्या ऑनलाईन पेमेंटवर सूटचाही फायदा मिळेल. या फायदा तुमच्या वॉलेटमध्ये ७ वर्कींग डेजमध्ये क्रेडिट होईल. तर कॅशबॅकसाठी तुम्हाला फक्त २४ तास वाट पाहावी लागेल. जे थेट मोबिक्विक वॉलेटमध्ये क्रेडिट होईल. 
कंपनीने यासाठी पेट्रोल पंपांची यादी आपल्या अॅप आणि वेबसाईटवर जाहिर केली आहे. यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.