`या` तरुणाचं गर्लफ्रेंडवरील प्रेम बघा, सोशल मीडियावर नुसती एकच चर्चा
इन्स्टाग्रामवर एका पेजवर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Instagram Viral Video : जगात आणि सोशल मीडियावर विविध प्रकारची लोकं आणि तसेच त्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काहींचे व्हिडीओ शिकवून जाणारे असतात तर काहींचे मजेशीर असतात. असाच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंडचा व्हिडीओ व्हायरल -
इन्स्टाग्रामवर एका पेजवर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत एक तरुण फोनवर बोलताना दिसतोय. फोनवर बोलत असताना तो भडकलेलाही आहे. फोनवर असलेल्या व्यक्तीला तो जेवण्याची विनंती करतोय. बाबू असं शब्दप्रयोग केल्यामुळे तो त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणत असल्याचा अंदाज आहे. ' मेरे बाबूने थाना (खाना) नही थाया (खाया), त्यो (क्यो) नही थाया (खाया) तो मै भी नही थाऊंगा (खाऊंगा) असं बोबड्या भाषेत तरुण अचानक रस्त्यावर येऊन फोनवर बोलताना दिसतोय. त्याच्या या फोनवरील संभाषणाने आजू- बाजूच्या मुली हसू आवरु शकल्या नाहीत. हा व्हिडीओ कुठल्यातरी बस स्टॉपवरील दिसतोय.
बोबड्या भाषेतील संभाषण ऐकून मुलींना हसू आवरेना -
संपूर्ण संभाषण ऐकल्यानंतर आजू - बाजूच्या मुली हसायला लागल्याचंही इथं स्पष्टपणे दिसत आहे. तरुणाची बोबडी पद्धत आणि मजेशीर संभाषणाने व्हिडीओ सुद्धा नेटकऱ्यांना चांगलाच आवडलाय. हा व्हिडीओ घंटा (ghantaa) नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.