Viral Video : देशभरात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव (navratri utsav 2023) साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवानिमित्तानं अनेक ठिकाणी जत्रांचे आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीतही (Delhi) नवरात्रोत्सवानिमित्तानं जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र यावेळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दिल्लीतील नरेला येथे एका नवरात्रीच्या जत्रेदरम्यान आकाशपाळणा हवेतच थांबला होता. या सगळ्या प्रकारामुळे पाळण्यात बसलेल्या लोकांचा जीव टांगणीला आला होता. पाळणा हवेत थांबला तेव्हा 50 जण त्यामध्ये बसले होते. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरात्रीच्या निमित्ताने दिल्लीतील नरेलामध्ये जत्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र यावेळी आकाशपाळणा अचानक बंद पडल्याने खळबळ उडाली होती. नवरात्रीच्या जत्रेत 50 जणांनी भरलेला आकाशपाळणा अचानक बंद झाला आणि त्यानंतर सर्वांचा श्वास थांबला. जत्रेतील हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन विभाग आणि दिल्ली पोलिसांना देण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, पाळण्यामध्ये बसलेल्या सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.


अर्ध्या तासाने सर्वांची सुटका


अचानक पाळणा बंद पडल्याने वर बसलेले लोक अर्धा तास अडकून पडले होते. यावेळी त्यांचा श्वास थांबला होता. तांत्रिक बिघाडामुळे आकाशपाळणा बंद पडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून तात्काळ कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक कर्मचारी व इतरांच्या मदतीने अडकलेल्यांची अर्ध्या तासाने सुटका केली.



मिळालेल्या माहितीनुसार, नरेला येथे रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास सुभाष रामलीला मंदारिन यांच्याकडून अग्निशमन विभागाला आकाशपाळणा बंद झाल्याची माहिती देण्यात आली होती. सुमारे 50 जण या पाळण्यात अडकले होते. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. यानंतर सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये फिरत असताना अचानक पाळणा कसा बंद झाला हे दिसत आहे. यानंतर अडकलेले लोक बाहेर येताना दिसत आहेत.