धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
ही घटना गुजरातमधील गीर सोमनाथची आहे. घटनेनंतर खालील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
गीर सोमनाथ : ही घटना गुजरातमधील गीर सोमनाथची आहे. घटनेनंतर खालील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अंगावर शहारे आणतो, कारण अपघात हा नजर चुकीने होत असतो, मात्र या घटनेत भरदिवसा एक मोटार सर्वांना चिरडत निघाली आहे. एका चौकात ही गाडी बेदरकारपणे येते, यात दोन मोटसायकल थोडक्यात बचावतात, यानंतर हा मोटार चालक रिव्हर्स घेतो, तेव्हा एक मोटरसायकल चाकाखाली येते, त्यात ३ जण थोडक्यात बचावतात, यानंतर त्याच वेगात हा चालक यूटर्न घेत, धुराडा उडवत फरार होतो. या अचानक घडलेल्या घटनेमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. सीसीटीव्ही ही घटना कैद झाल्याने हा थरार समोर आला आहे.